मंचर प्रतिनिधी
शिरदाळे (ता.आंबेगाव जि पुणे ) येथील गाव तळ्यातील दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत .तळ्यात दिसणारा पाणीसाठा हा फक्त दिसण्यासाठीच आहे.या वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे तळ्यात पाणीसाठा वाढला नाही.परिणामी तळ्यातील पाणी रापले आहे.त्यामुळे पाण्यातून दुर्गंधी यायला सुरुवात झाली।आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी नळाद्वारे पाणीपुरवठा होणार्या विहीरीतील पाणी संपत आले आहे. तळ्यातील बारवे मधून पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवसच होत आहे.असा दावा नागरिकांना केला जातो आहे. नळाद्वारे येणारे पाणी खराब असल्याने त्यातून अक्षरशः दुर्गंधी येत आहे.खराब पाणी फिल्टर सोडले जाते आहे.
त्यामुळे फिल्टर मशीनचे कारटेज वारंवार खराब होत असून त्यामुळे नागरिकांना फिल्टर पाणी देखील वेळेवर मिळत नाही.त्यामुळे भर उन्हाळ्यात शिरदाळे ग्रामस्थांवर पाणी असून पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
प्रशासनाने या बाबतीत दखल घेऊन तात्पुरती सुविधा उपलब्ध करावी. याबाबतचे निवेदन लवकरच ग्रामपंचायतच्या वतीने पंचायत समिती आंबेगाव येथे देण्यात येणार असल्याचे सरपंच सुप्रिया मनोज तांबे, उपसरपंच बीपीन चौधरी,माजी सरपंच वंदना तांबे,माजी उपसरपंच मयुर सरडे,ग्रा.पं. सदस्य मोहिनी तांबे,कविता तांबे यांनी सांगितले.
याबाबतचा ठराव मासिक सभेमध्ये पास करून त्याची प्रत पंचायत समितीला दिली जाईल. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून लवकरच आमदार दिलीप वळसे पाटील यांना देखील निवेदन देण्यात येणार असल्याचे मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे यांनी सांगितले.
सध्या तरी उन्हाळा तोंडावर असल्याने तात्पुरती सोय होण्याची गरज आहे.पाणी दूषित आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आजाराचे प्रमाण वाढत आहे.दुषित पाणी विहिरीला जात असते. त्यामुळे नागरिक जास्त प्रमाणात त्रस्त असून प्रशासनाने लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शिरदाळे ग्रामस्थ करत आहे.
रोजच्या दैनंदिन जीवनातील पाणी हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे सध्या तलावात पाणीसाठा दिसत आहे परंतु तो खूप दूषित झाला आहे.त्याची दुर्गंधी यायला लागली आहे.त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने लवकरच पंचायत समितीला तसेच आमदार वळसे पाटील यांना निवेदन देऊन पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार आहे.
सुप्रिया मनोज तांबे
(सरपंच शिरदाळे)
मयूर सरडे
( माजी उपसरपंच शिरदाळे
