घोडेगाव प्रतिनिधी
फुलवडे (ता. आंबेगाव) : माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या खासदार निधीतून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या प्रयत्नातून फुलवडे येथे भव्य सभा मंडपाचे भूमिपूजन समारंभ पार पडला. तसेच यावेळी हिलेवाडी (फुलवडे) येथील आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे चौकाचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका युवक अध्यक्ष विशाल वाबळे यांच्यासह फुलवडे गावचे सरपंच बबनराव मोहरे सामाजिक कार्यकर्ते राजू घोडे, सरिता माळी, विशाल भोर, सोमनाथ गंगे, आदिनाथ हिले, नितीन ठुबल, संदीप माळी, सचिन ठुबल, अनिता आढारी आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांनी गावाच्या विकासासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत, भविष्यातही विविध विकासकामे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला
