पुणे विभागीय स्पर्धेत मंचर येथील महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे घवघवीत यश

Share


पुणे (प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि पुणे जिल्हा परिषद, पुणे आयोजित पुणे विभागीय मैदानी स्पर्धा बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाली या स्पर्धेत महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कूल मंचरचा विद्यार्थी कु.संग्राम शीतल साईनाथ लोंढे याने 400 मीटर व 600 मीटर रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले. त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

यासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल विठ्ठल गांजाळे यांनी परिश्रम घेतले व शाळेच्या मुख्यधपिका चित्रा अरविंद बांगर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व स्थानिक स्कूल समिती यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Related Articles

ताज्या बातम्या