Connect with us

शेतीशिवार

जारकवाडीत मलचिंग पेपरवर कांदा लागवड

Published

on

Share

राजु देवडे (निरगुडसर)
आंबेगावच्या पूर्व भागातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे शेतात बेडचा वापर करून मलचिंग पेपरवर उन्हाळी कांदा लागवड केली आहे. जारकवाडी ( ता.आंबेगाव ) येथील शेतकरी नवनाथ भाऊ भोजणे, संदीप लोले, माऊली धानापुणे यांसह अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. पूर्व आंबेगावात सध्या उन्हाळा कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. शेतकरी सतत
शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी धडपडत असतात. पारंपारिक पद्धतीने पाटपाण्यावरील लागवडीला फाटा देत मल्चिंग पेपर व ठिबक सिंचना आधारे कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेण्यायासाठी शेतकरी प्रयत्नशील असतो.
आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवत आहे.शेतकरी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन या तंत्राआधारे कांद्याची आधुनिक शेती करू लागले आहेत.
भारनियमन आणि बिबट्यांपासून बचाव पाटपाण्यावर कांदा उत्पादन घेताना थंडीत रात्री अपरात्री पिकाला पाणी द्यावे लागत होते. पूर्व आंबेगाव हे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे रात्री पाणी देण्यासाठी जायला भीती वाटायची. बिबट्यांचे हल्ले आणि प्रसंगी शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानावरील पद्धतीमुळे पाणी देण्याच्या वेळा व वापर पद्धतीत बदल झाला. कष्ट कमी झाले. भारनियमन आणि बिबट्याची भीती कमी झाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

मलचिंग पेपरवरील कांदा लागवडीचे फायदा

  • मल्चिंग पेपरवर एकसारख्या अंतरावरील छिद्रांमुळे दोन रोपांमधील अंतर एकसारखे राहाते. परिणामी कांद्याची वाढ चांगल्या प्रकारे होते. प्रति कांद्याचे साधारण वजन चांगल्या ग्रॅमपर्यंत मिळते.

रंग आणि आकार एकसारखा राहिल्याने बाजारात चांगले दर मिळण्यास मदत होते

तणांची वाढनियंत्रणात ठेवण्यात येते. खुरपणी खर्च व तणनाशकांच्या फवारणीत बचत होते

  • टिकवण क्षमतेत चांगली वाढ. त्यामुळे बाजारपेठेच्या अंदाजानुसार विक्री नियोजनाला संधी मिळते
  • पारंपरिक पद्धतीमध्ये पाटपाण्यावर कांदा लागवडीसाठी वाफ्यांमध्ये पाणी साठवावे लागत असे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत होता. आता ठिबक व मल्चिंगमुळे पाण्याची बचत होणार आहे.
Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

पारनेर, कान्हूर मंडळातील शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांना मागणी

Published

on

Share

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान न दिल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा

पारनेर : प्रतिनिधी

 सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही, पारनेर महसूल मंडळ आणि कान्हूर पठार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबाबतचे अनुदान न देणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, यांच्या वतीने शुक्रवारी महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की “तालुक्यातील इतर महसूल मंडळांप्रमाणेच पारनेर व कान्हूर पठार महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासनाच्या निकषांनुसार या दोन विभागांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, हे अन्यायकारक आहे.”

  निवेदनात तहसील प्रशासनाने शासन दरबारी सकारात्मक अहवाल पाठवून, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच “जर आठ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर तहसील कार्यालयावर मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला आहे.

 यावेळी उपस्थित युवा शेतकऱ्यांनी सांगितले की, पारनेर व कान्हूर पठार भागात सलग पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, भुईमूग, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पावसाच्या निकषांच्या चुकीच्या गणनेमुळे या भागातील शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहिले आहेत.

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी पुढाकार घेतला गेला आहे. “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे, दया नाही,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

 जर पुढील काही दिवसांत शासनाकडून ठोस निर्णय झाला नाही, तर पारनेर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोठा आक्रोश मोर्चा नेण्यात येणार असून, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

 यावेळी मारुती रेपाळे, दीपक लंके,जितेश सरडे,संदीप गाडेकर,योगेश मते, भूषण शेलार, अर्जुन भालेकर, बापू चत्तर,चंद्रभान ठुबे,दीपक पाडळकर, किरण ठुबे, सुभाष रेपाळे, मोहन रेपाळे, बबन डमरे, राहुल चेडे,प्रसाद नवले, विनोद उदार, नीलेश दुश्मन,  प्रशांत बोरुडे, हिरामण  चेडे,शहाजी थोरात, सुरेश झगडे, एकनाथ पवार, मयूर गायकवाड, प्रमोद वाखारे, शिवाजी शिंदे, सुहास साळवे, भाऊसाहेब शिंदे, सुरेश पवार,  प्रवीण थोरात, प्रशांत साळवे,  राजेंद्र शेरकर, अंकुश शेरकर, शरद खोडदे,  प्रसन्ना मोरे, सागर जपे, नंदू सोनवणे, दादाभाऊ ठोंबरे, बाळू लोंढे, दत्तात्रय गुंड, भाऊसाहेब गुंड,  सरदार शेख, गणेश तांबे, धनंजय व्यवहारे, सुभाष नवले, अभिजीत झावरे, अमित जाधव, सावकार शिंदे, विजय शेरकर, नवनाथ वाळुंज, सचिन औटी, दत्तात्रय निमसे, बाळासाहेब नगरे, कारभारी पोटघन,दादाभाऊ चेडे आदी उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

जारकरवाडीत पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बिरोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापनेपासून ते विजयादशमी या कालावधीत नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनपर कीर्तने संपन्न झाली. विजया दशमीच्या दिवशी गंगेचे पाणी, पाण्याची मिरवणूक, महाआरती, काठीची मिरवणूक संपन्न झाली. संध्याकाळी बिरोबाचे पुजारी गणपत मंचरे यांच्या हस्ते भंडाऱ्याची उधळण करत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला.

नवरात्रोत्सव कार्यकाळात दुध संघाचे माजी संचालक दौलत लोखंडे, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक रमेश लबडे, पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, जारकरवाडी सरपंच प्रतिक्षा बढेकर, उपसंरपंच सचिन टाव्हरे, कौसल्या भोजने, सुरेखा निघोट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरण वाळुंज, उद्योजक दत्ताराम वैद, चेअरमन खंडु भोजणे, उद्योजक रामहरी देवडे, आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा पुजा वळसे पाटील, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षा रुपाली भोजने आदी मान्यवरांनी नवरात्रोत्सवाला भेटी दिल्या. दसऱ्याच्या दिवशी रात्री आठ नंतर मयुर सरडे व प्रतीक्षा भांड यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला

कार्यकमाची व्यवस्था नवनाथ मंचरे, अविनाश तागड दिपक पाचपुते कचरदास भोजणे,रविंद्र भांड,मंगेश भोसले, सत्यवान भोसले,अविनाश पवार, एकनाथ मच्छिंद्र भांड, गोरक्षनाथ भांड, पोपट भोजणे, उत्तम मंचरे व गावातील तरूणांनी पाहिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्ती भांड, प्रतिक्षा भांड भागाजी भांड यांनी केले.

Continue Reading

गावागावातुन

भीमाशंकर कारखान्याकडुन सभासद व ऊस उत्पादकांना गावोगावी जाऊन साखर वाटप

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनानुसार सभासद व ऊस उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली निमित्त गाव व गटवार साखर वाटपाचे नियोजन केले आहे. त्यानुसार शनिवार दि. ४ ऑक्टोबर ते रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत रु. २०/- प्रति किलो दराने गावोगावी साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


सभासद व ऊस उत्पादकांना भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहे. नियोजीत साखर वाटप तारखेला फक्त स्मार्ट कार्डद्वारेच साखर वाटप करण्यात येणार असल्याने सभासद व ऊस उत्पादकांनी दिलेली स्मार्ट कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. चालू वर्षी साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये ऊस पुरविलेला आहे यांचेसाठी राहील. त्यामध्ये (१) रु. १०,०००/- त्यापुढील भाग रक्कम व ऊस उत्पादक – ८० किलो (२) फक्त भागधारक अथवा फक्त ऊस उत्पादक – ६० किलो (३) भागासाठी रु. १०,०००/- पेक्षा कमी जमा रक्कम तसेच ऊस नाही – ५० किलो याप्रमाणे खालील तारखेनुसार विभागीय शेतकी गटांतर्गत गावोगावी १०, २० व ५० किलो पॅकींगमध्ये साखर वाटपाचे नियोजन केलेले आहे.

  • शनिवार दि. ४ – पारगाव गटातील गावे,
  • रविवार दि. ५ – पारगाव गाव, निरगुडसर व जांबूत गटातील गावे,
  • सोमवार दि. ६ – निरगुडसर व पिंपरखेड गाव, कळंब व रांजणी गटातील गावे,
  • मंगळवार दि. ७ – मंचर गटातील गावे,
  • बुधवार दि. ८ – मंचर व अवसरी खुर्द गाव व घोडेगाव गटातील गावे,
  • गुरुवार दि. ९ – टाकळी हाजी व कवठे गटातील गावे,
  • शुक्रवार दि. १० – टाकळी हाजी व कवठे गाव, करंदी, जातेगाव गटातील गावे,
  • शनिवार दि. ११ – करंदी व जातेगाव गाव, भोरवाडी, निमगाव सावा,
    नारायणगाव, ओझर गटातील गावे,
  • रविवार दि. १२ – भोरवाडी, निमगाव सावा, नारायणगाव, खेड गटातील गावे, जे सभासद व ऊस उत्पादक वरील नियोजीत कालावधीत आपआपले गावामधून साखर घेवू शकणार नाहीत त्यांना साखर सोमवार दि. १३ ऑक्टोबर ते सोमवार दि. २० ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये (साप्ताहिक सुट्टी गुरुवार सोडून) कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वाटप केली जाणार आहे. त्याशिवाय राहिलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे. गर्दी कमी करण्यासाठी गावोगावी साखर वाटपाचे प्रमाण विचारात घेवून काही गावांमध्ये सलग २ दिवस वाटपाचे नियोजन केले असून सभासद व ऊस उत्पादकांनी साखर घेवून जाणेचे सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada