सामाजिक
संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर या संस्थेच्या 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मंचर या संस्थेच्या 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशित नुकतेच पारगाव तालुका आंबेगाव येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पारगाव तालुका आंबेगाव येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे दिनदर्शिकेचे प्रकाशन भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले,ज्ञानेश्वर आस्वारे,शरद ब्यांकेचे संचालक दौलतभाई लोखंडे, संस्थेचे संचालक अशोक करंडे ,विलास लबडे ,गावच्या सरपंच श्वेता ढोबळे, उपसरपंच नितीन ढोबळे, माजी सरपंच बबन ढोबळे,पुरुषोत्तम जोरी, दत्ताराम वैद्य,पप्पू खुडे,विशाल करंडे ,मंगेश करंडे,भागचंद पोंदे,संजय बढेकर,दत्तात्रय देवडे,बाळासाहेब लबडे,संचिता आत्रे,नेहा टाव्हरे यांसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी पतसंस्था राबवित असलेल्या योजना याबद्दल माहिती देण्यात आली.
गावागावातुन
“सेवाभावातून वयोवृद्धांना नवसंजीवनी..!” ब्राह्मणी येथे ‘वयोश्री योजना’ अंतर्गत आरोग्य तपासणी व मोफत सहाय्यक साधन शिबिर यशस्वी संपन्न..!
ब्राह्मणी (ता. राहुरी) : (प्रतिनिधी)
समाजसेवेचा अखंड ध्यास आणि वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्य व स्वावलंबनासाठीची बांधिलकी जपत, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर संचलित प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र यांच्या वतीने ‘वयोश्री योजना’ अंतर्गत दोन दिवसीय भव्य आरोग्य तपासणी व सहाय्यक साधन वितरण शिबिर नुकतेच ब्राह्मणी येथे यशस्वीपणे पार पडले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (भारत सरकार), अॅलिम्को, कानपूर आणि ग्रामपंचायत ब्राह्मणी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर २ व ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरादरम्यान एकूण ७२१ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, ते ‘वयोश्री योजना’चे पात्र लाभार्थी ठरले आहेत. या लाभार्थ्यांना व्हीलचेअर, कमोड चेअर, श्रवणयंत्र, पाठीचा पट्टा, कमरेचा पट्टा, मानपट्टा, काठी इत्यादी विविध सहाय्यक साधनांचे विनामूल्य वितरण लवकरच करण्यात येणार आहे. या साधनांची एकूण अंदाजित किंमत ₹४७,१३,२३८ इतकी आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून मा. खा. डॉ. सुजय (दादा) विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र हे पुन्हा एकदा समाजसेवेचे आदर्श उदाहरण ठरले आहे. या केंद्रामार्फत दररोज अनेक वयोवृद्ध नागरिकांना आरोग्य सल्ला, वैद्यकीय मदत आणि सहाय्यक साधनांची सुविधा पुरविली जाते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत ब्राह्मणीचे सरपंच सुरेश मानकर तसेच अॅलिम्को, कानपूर यांचे विशेष सहकार्य लाभले. या योजनेमुळे वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान आणि स्वाभिमानाचे तेज पुन्हा झळकले.
“सेवाभावातून समाजसेवा” हे ब्रीद जपत,
डॉ. विखे पाटील फाउंडेशन, अहिल्यानगर यांनी
वयोवृद्ध नागरिकांसाठी पुन्हा एकदा
‘आशेचा किरण’ निर्माण केला आहे.
गावागावातुन
पारनेर, कान्हूर मंडळातील शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांना मागणी
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान न दिल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा
पारनेर : प्रतिनिधी
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही, पारनेर महसूल मंडळ आणि कान्हूर पठार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबाबतचे अनुदान न देणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, यांच्या वतीने शुक्रवारी महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की “तालुक्यातील इतर महसूल मंडळांप्रमाणेच पारनेर व कान्हूर पठार महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासनाच्या निकषांनुसार या दोन विभागांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, हे अन्यायकारक आहे.”

निवेदनात तहसील प्रशासनाने शासन दरबारी सकारात्मक अहवाल पाठवून, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच “जर आठ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर तहसील कार्यालयावर मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित युवा शेतकऱ्यांनी सांगितले की, पारनेर व कान्हूर पठार भागात सलग पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, भुईमूग, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पावसाच्या निकषांच्या चुकीच्या गणनेमुळे या भागातील शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी पुढाकार घेतला गेला आहे. “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे, दया नाही,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
जर पुढील काही दिवसांत शासनाकडून ठोस निर्णय झाला नाही, तर पारनेर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोठा आक्रोश मोर्चा नेण्यात येणार असून, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी मारुती रेपाळे, दीपक लंके,जितेश सरडे,संदीप गाडेकर,योगेश मते, भूषण शेलार, अर्जुन भालेकर, बापू चत्तर,चंद्रभान ठुबे,दीपक पाडळकर, किरण ठुबे, सुभाष रेपाळे, मोहन रेपाळे, बबन डमरे, राहुल चेडे,प्रसाद नवले, विनोद उदार, नीलेश दुश्मन, प्रशांत बोरुडे, हिरामण चेडे,शहाजी थोरात, सुरेश झगडे, एकनाथ पवार, मयूर गायकवाड, प्रमोद वाखारे, शिवाजी शिंदे, सुहास साळवे, भाऊसाहेब शिंदे, सुरेश पवार, प्रवीण थोरात, प्रशांत साळवे, राजेंद्र शेरकर, अंकुश शेरकर, शरद खोडदे, प्रसन्ना मोरे, सागर जपे, नंदू सोनवणे, दादाभाऊ ठोंबरे, बाळू लोंढे, दत्तात्रय गुंड, भाऊसाहेब गुंड, सरदार शेख, गणेश तांबे, धनंजय व्यवहारे, सुभाष नवले, अभिजीत झावरे, अमित जाधव, सावकार शिंदे, विजय शेरकर, नवनाथ वाळुंज, सचिन औटी, दत्तात्रय निमसे, बाळासाहेब नगरे, कारभारी पोटघन,दादाभाऊ चेडे आदी उपस्थित होते.
गावागावातुन
जारकरवाडीत पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा
मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बिरोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापनेपासून ते विजयादशमी या कालावधीत नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनपर कीर्तने संपन्न झाली. विजया दशमीच्या दिवशी गंगेचे पाणी, पाण्याची मिरवणूक, महाआरती, काठीची मिरवणूक संपन्न झाली. संध्याकाळी बिरोबाचे पुजारी गणपत मंचरे यांच्या हस्ते भंडाऱ्याची उधळण करत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला.

नवरात्रोत्सव कार्यकाळात दुध संघाचे माजी संचालक दौलत लोखंडे, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक रमेश लबडे, पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, जारकरवाडी सरपंच प्रतिक्षा बढेकर, उपसंरपंच सचिन टाव्हरे, कौसल्या भोजने, सुरेखा निघोट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरण वाळुंज, उद्योजक दत्ताराम वैद, चेअरमन खंडु भोजणे, उद्योजक रामहरी देवडे, आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा पुजा वळसे पाटील, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षा रुपाली भोजने आदी मान्यवरांनी नवरात्रोत्सवाला भेटी दिल्या. दसऱ्याच्या दिवशी रात्री आठ नंतर मयुर सरडे व प्रतीक्षा भांड यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला
कार्यकमाची व्यवस्था नवनाथ मंचरे, अविनाश तागड दिपक पाचपुते कचरदास भोजणे,रविंद्र भांड,मंगेश भोसले, सत्यवान भोसले,अविनाश पवार, एकनाथ मच्छिंद्र भांड, गोरक्षनाथ भांड, पोपट भोजणे, उत्तम मंचरे व गावातील तरूणांनी पाहिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्ती भांड, प्रतिक्षा भांड भागाजी भांड यांनी केले.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक11 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान