पहाडदरा ता.आंबेगाव येथे महाराजस्व अभियान संपन्न

Share

निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे

पहाडदरा ( ता.आंबेगाव ) येथे महाराजस्व अभियान नुकतेच संपन्न झाले.जुन्नर आंबेगाव विभागाचे प्रांत गोविंद शिंदे व आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजस्व अभियान शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नुकताच पहाडदरा येथे संपन्न झाला.


भीमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यामध्ये रेशनिंग कार्ड १६ प्रकरण, निवडणूक विभागाची ५७ प्रकरण, आधार कार्ड ९, संजय गांधी योजना ५, आधार कार्ड ९, उत्पन्न दाखले ३५, जातीचे दाखले ४५, जॉब कार्ड १०, जन्म मृत्यू दाखले १६ इत्यादी दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याकरिता तसेच सर्वसामान्य जनता यांचे महसूल विभागा अंतर्गत असणाऱ्या कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन आपल्या दारी या धर्तीवर महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
गाव पातळीवर लोकांना गावातच ही सेवा मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच शेतकऱ्यांचे कामे गतिमान व्हावे व त्यांना त्यांच्या कार्याची पूर्तता व्हावी या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत असून या अंतर्गत विविध विभागाच्या शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी हेच एक ध्येय ठेवून हे अभियान राबविण्यात आले आहे.

यावेळी पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच कैलास वाघ, तहसीलदार कार्यालाचे आर.व्ही.सुपे, पारगावचे मंडलाधिकारी व्हि. एम. शिंदे, कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे ,बाळासाहेब घुले ख‌.वि‌.संघाचे माजी अध्यक्ष भगवान वाघ, ग्रामपंचायत सदस्य संकेत वायकर, रूपाली वाघ, पोलीस पाटील निलेश भालेराव, तलाठी ऋतुराज ढवळे,ग्रामसेवक जाधव मॅडम, कोतवाल गणपत भंडालकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या