Connect with us

शेतीशिवार

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले अनेक गावांंतील शेतीपिकांना होनार फायदा.

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी


डिंभे धरण (हुतात्मा बाबु गेणु जलाशयातून) उजव्या कालव्याला पाणी सोडल्यामुळे आंबेगाव-शिरूर तालुक्‍यातील सुमारे ६० गावातील शेतीपिकांना फायदा होणार आहे. पाण्याचे आवर्तन अंदाजे एक महिना चालणार आहे. आंबेगाव, शिरूर, तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेटसावू लागला होता.याबाबत उजव्या कालव्या लगत असलेल्या शेतकऱ्यांकडून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत होती.तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले होते. या संदर्भात आज पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी डिंभे धरण तसेच घोड व मीना शाखा कालव्यात उन्हाळी हंगामातील पिकाच्या सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सद्या डिंभे धरणात ६४.६४ टक्के पाणीसाठा असुन उजव्या कालव्याला शनिवारी (ता. २४ ) रोजी १२ वाजता पाणी सोडण्यात आलेअसल्याचे शासकीय उपविभागीय अभियंता दत्ता कोकणे यांनी सांगितले.या पाण्यामुळे आंबेगाव तालुक्यातील नारोडी, लांडेवाडी, मंचर, अवसरी खुर्द, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी व शिरूर तालुक्यातील सविंदणे, कवठे, मलठण, सोनसांगवी इत्यादी गावांना पाण्याचा फायदा होणार आहे.पाण्याचे आवर्तन अंदाजे जवळपास ३० दिवसांहून अधिक चालणार असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. तीव्र उन्हामुळे विहीर आणि पाझर तलावातील पाणी झपाट्याने कमी होऊ लागले होते. त्यामुळे ऐन पाणी टंचाईच्या काळात पाणी सोडल्याने शेतीपिकांना दिलासा मिळणार आहे. कालव्यात पाणी नसल्याने अनेक शेती पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती मात्र आता पाणी आल्याने शेती पिकाचा जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

नागापूर तालुका आंबेगाव गावातील पवार मळा परिसरात शुक्रवारी दिनांक २७ तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. महीना भरात हा चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे. नागपूर गावातील प्रसिद्ध देवस्थान थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेला पवार मळ्यात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते पैकी १३ फेब्रुवारीला मादी जेरबंद झाली. त्यानंतर २५ फेब्रुवारीला बछडा जेरबंद झाला. त्यानंतर पुन्हा २७ मध्यरात्रीच्या दरम्यान बिबट मादी जेरबंद झाली २ मार्चला पुन्हा नर जातीचा बछडा अंदाजे वय १५ पिंजऱ्यात जर बंद झाला नागापूर गावचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला ही माहिती दिली.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडल अधिकारी फुलमाळी वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी मादीला सुखरूपरीत्या ताब्यात घेऊन जुन्नर तालुक्यातील माणिकडोह निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. सलग तीन बिबटे जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.

सलग चौथा बिबटे जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मागील काही दिवसांपासून जनावरांवर हल्ल्यांच्या घटना व बिबट्यांच्या हालचालीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, वनविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाणे, लहान मुलांना घराबाहेर एकटे न सोडणे तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

पारनेर, कान्हूर मंडळातील शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवा राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांना मागणी

Published

on

Share

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान न दिल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा

पारनेर : प्रतिनिधी

 सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही, पारनेर महसूल मंडळ आणि कान्हूर पठार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीबाबतचे अनुदान न देणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, यांच्या वतीने शुक्रवारी महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की “तालुक्यातील इतर महसूल मंडळांप्रमाणेच पारनेर व कान्हूर पठार महसूल मंडळांमध्येही अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शासनाच्या निकषांनुसार या दोन विभागांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे, हे अन्यायकारक आहे.”

  निवेदनात तहसील प्रशासनाने शासन दरबारी सकारात्मक अहवाल पाठवून, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच “जर आठ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, तर तहसील कार्यालयावर मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल,” असा इशाराही देण्यात आला आहे.

 यावेळी उपस्थित युवा शेतकऱ्यांनी सांगितले की, पारनेर व कान्हूर पठार भागात सलग पावसामुळे सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, भुईमूग, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पावसाच्या निकषांच्या चुकीच्या गणनेमुळे या भागातील शेतकरी शासन मदतीपासून वंचित राहिले आहेत.

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी पुढाकार घेतला गेला आहे. “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला मदत मिळणे ही शासनाची जबाबदारी आहे, दया नाही,” अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

 जर पुढील काही दिवसांत शासनाकडून ठोस निर्णय झाला नाही, तर पारनेर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांसह मोठा आक्रोश मोर्चा नेण्यात येणार असून, तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या आंदोलनात सहभागी होतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

 यावेळी मारुती रेपाळे, दीपक लंके,जितेश सरडे,संदीप गाडेकर,योगेश मते, भूषण शेलार, अर्जुन भालेकर, बापू चत्तर,चंद्रभान ठुबे,दीपक पाडळकर, किरण ठुबे, सुभाष रेपाळे, मोहन रेपाळे, बबन डमरे, राहुल चेडे,प्रसाद नवले, विनोद उदार, नीलेश दुश्मन,  प्रशांत बोरुडे, हिरामण  चेडे,शहाजी थोरात, सुरेश झगडे, एकनाथ पवार, मयूर गायकवाड, प्रमोद वाखारे, शिवाजी शिंदे, सुहास साळवे, भाऊसाहेब शिंदे, सुरेश पवार,  प्रवीण थोरात, प्रशांत साळवे,  राजेंद्र शेरकर, अंकुश शेरकर, शरद खोडदे,  प्रसन्ना मोरे, सागर जपे, नंदू सोनवणे, दादाभाऊ ठोंबरे, बाळू लोंढे, दत्तात्रय गुंड, भाऊसाहेब गुंड,  सरदार शेख, गणेश तांबे, धनंजय व्यवहारे, सुभाष नवले, अभिजीत झावरे, अमित जाधव, सावकार शिंदे, विजय शेरकर, नवनाथ वाळुंज, सचिन औटी, दत्तात्रय निमसे, बाळासाहेब नगरे, कारभारी पोटघन,दादाभाऊ चेडे आदी उपस्थित होते.

Continue Reading

गावागावातुन

जारकरवाडीत पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बिरोबा मंदिरात पारंपरिक पद्धतीने दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापनेपासून ते विजयादशमी या कालावधीत नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रातील नामवंत प्रबोधनपर कीर्तने संपन्न झाली. विजया दशमीच्या दिवशी गंगेचे पाणी, पाण्याची मिरवणूक, महाआरती, काठीची मिरवणूक संपन्न झाली. संध्याकाळी बिरोबाचे पुजारी गणपत मंचरे यांच्या हस्ते भंडाऱ्याची उधळण करत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला.

नवरात्रोत्सव कार्यकाळात दुध संघाचे माजी संचालक दौलत लोखंडे, भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक रमेश लबडे, पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, जारकरवाडी सरपंच प्रतिक्षा बढेकर, उपसंरपंच सचिन टाव्हरे, कौसल्या भोजने, सुरेखा निघोट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरण वाळुंज, उद्योजक दत्ताराम वैद, चेअरमन खंडु भोजणे, उद्योजक रामहरी देवडे, आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी अध्यक्षा पुजा वळसे पाटील, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्षा रुपाली भोजने आदी मान्यवरांनी नवरात्रोत्सवाला भेटी दिल्या. दसऱ्याच्या दिवशी रात्री आठ नंतर मयुर सरडे व प्रतीक्षा भांड यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला

कार्यकमाची व्यवस्था नवनाथ मंचरे, अविनाश तागड दिपक पाचपुते कचरदास भोजणे,रविंद्र भांड,मंगेश भोसले, सत्यवान भोसले,अविनाश पवार, एकनाथ मच्छिंद्र भांड, गोरक्षनाथ भांड, पोपट भोजणे, उत्तम मंचरे व गावातील तरूणांनी पाहिली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्ती भांड, प्रतिक्षा भांड भागाजी भांड यांनी केले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada