काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील अंगणवाडी साठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सीएसार फंडातून पाच लाख रुपये निधी.

Share

निरगुडसर प्रतिनिधी- राजु देवडे

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील अंगणवाडी साठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सीएसार फंडातून पाच लाख रुपये निधी देण्यात आला असून. या कामाचा भूमिपूजन समारंभ कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

काठापूर बुद्रुक येथील गावठाण अंगणवाडीस भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 5 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या निधीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे,व्हा.चेअरमन प्रदिप वळसे पाटील, संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे,बाबासाहेब खालकर, बाजीराव बारवे, दादाभाऊ पोखरकर,आनंदराव शिंदे ,माऊली आस्वारे,नितीन वाव्हळ,पुष्पलता जाधव, मच्छिंद्र गावडे ,पोपटराव थीटे,सरपंच अशोक करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे,पप्पू खुडे,रोहिदास तुळे, शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष राहुल भुरके ,उपाध्यक्ष काळुराम टिंगरे, यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
काठापूर बुद्रुक येथे अंगणवाडी साठी भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून सी एस आर फंडातून पाच लाख रुपये निधी देण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल करंडे यांनी केले, सरपंच अशोक करंडे,राहुल भुरके,प्रदिप वळसे पाटील, चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंगेश करंडे यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या