Connect with us

गावागावातुन

काठापुर बुद्रुक येथे उसाला लागलेल्या आगीत दहा एकर उस जळाला, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान.

Published

on

Share

लोणी धामणी प्रतिनिधी-राजु देवडे

काठापूर बुद्रुक या ठिकाणी विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीमध्ये 10 एकर उस जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी माघणी शेतकर्यांनी केली आहे.

काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव या ठिकाणी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजेच्या तारांमधे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ऊस पिकाला आग लागली यामध्ये शेतकरी पियुष गांधी, गणपत कांबळे, दत्तात्रय कांबळे, कांताराम कांबळे,मधुकर कांबळे भिवाजी कांबळे ,शिवाजी कांबळे,कौसाबाई करंडे व ईतर शेतकऱ्यांच्या शेतातील उस जळून गेला आहे.ही शेती एकमेकाला लागून असून.या सर्वच 10 ते 12 एकर मधील क्षेत्रावर उसाचे पीक होते.या ठिकाणी दुपारी अचानक विज तारांमध्ये घर्षण होत ऊसाला आग लागली.यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाला असून शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सरपंच अशोक करंडे व शेतकऱ्यांनी केली आहे.


काठापूर बुद्रुक या ठिकाणी एमएससीबी विभागाचे सब स्टेशन आहे या ठिकाणावरून आजूबाजूच्या परिसरातील गावांना वीज पुरवठा केला जातो त्यामुळे काठापूर बुद्रुक गावात मोठ्या प्रमाणावर विजेच्या तारा पसरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी विज तारांची उंची कमी आहे. तर काही ठिकाणी तारांना झोळ आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीच्या अनेक घटना घडत असतात. माघील एक महिन्याभरापूर्वी ही अशीच आगली होती.महिनाभर पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याने 10 एकर क्षेत्रावरील उस जळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तोडणीला आलेला ऊस वाया जाणार आहे. साखर कारखाने अजूनही एक ते दीड महिन्यात सुरू होणार नाही त्यामुळे ऊस कारखाना हा उस तोडून नेणार नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सदर ठिकाणी तलाठी जितेंद्र शेजुळ,यांनी पंचनामा केला.यावेळी बिट अंमलदार ए.बी.मडके,एम.एस.ए.बी विभागाचे अधिकारी, भिमाशंकर कारखान्याचे अधिकारी, पोलीस पाटील अमोल करंडे,माजी उपसरपंच विशाल करंडे उपस्थित होते.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

साहेबराव जगताप यांचे निधन

Published

on

Share

निंबवी ता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) : निंबवी (ता.श्रींगोदां जि अहिल्या नगर)येथील ठाणे परिवहन विभागातील निवृत्त कर्मचारी साहेबराव हौसेराम जगताप यांचे शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले.

साहेबराव जगताप हे शांत, मनमिळावू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या जाण्याने एक जेष्ठ मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी . मीना जगताप, मुलगी निलिमा खळे, रजनी मिरके, भाऊ बाजीराव जगताप, मुलगा आकाश जगताप असा परिवार आहे.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता निंबवी येथे जलदान विधी व पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समस्त जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Continue Reading

गावागावातुन

मंचर बस स्थानकाचा कायापालट: ५ कोटी ३६ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी

Published

on

Share

​माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; बसस्थानक परिसर होणार चकाचक

मंचर (प्रतिनिधी):
आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंचर बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी घोषणा झाली आहे. राज्याचे माजी मंत्री व आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंचर बस स्थानकाच्या विविध कामांसाठी ५ कोटी ३६ लाख २९ हजार ५५९ रुपयांच्या निधीला जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
​जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने ‘जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६’ अंतर्गत हे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.


​मंजूर झालेली प्रमुख कामे आणि निधी:
​मंचर बस स्थानकाच्या आवारात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पावसाळ्यात होणारा चिखल व धुळीचा त्रास कायमचा संपवण्यासाठी खालील दोन महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत:
​१. सिमेंट काँक्रीटीकरण: बस स्थानक परिसरात सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ कोटी १६ लाख २९ हजार ९७० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे स्थानकाचा संपूर्ण परिसर सुसज्ज आणि स्वच्छ होणार आहे.

२.संरक्षक भिंत: स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला १९ लाख ९९ हजार ५८९ रुपये मंजूर झाले आहेत.

​मंचर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. बस स्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या कामांसाठी विशेष निधी मिळावा म्हणून शासनाकडे आणि जिल्हा नियोजन समितीकडे विशेष आग्रह धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.


“मंचर बस स्थानकाचा परिसर सुसज्ज असावा ही नागरिकांची जुनी मागणी होती. या निधीमुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”
— दिलीपरावजी वळसे पाटील (माजी मंत्री तथा आमदार, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ)

Continue Reading

गावागावातुन

रांजणी येथे भव्य रोजगार मेळावा; टाटा मोटर्सकडून ५५ युवकांना जागेवर नियुक्तीपत्र

Published

on

Share

रांजणी (ता. आंबेगाव) – स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रांजणी येथे शनिवार, दिनांक २१ मार्च रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका केतन वाघ आणि केतन वाघ यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.


या मेळाव्यात देशातील अग्रगण्य वाहननिर्मिती कंपनी टाटा मोटर्स सहभागी झाली होती. कंपनीकडून अरविंद काळे, गोवर्धन पांचाळ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे मुलाखत पथक उपस्थित राहून उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली.

या रोजगार मेळाव्यास सुमारे २५० हून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५ पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना टाटा मोटर्सकडून जागेवरच नियुक्तीपत्र (जॉइनिंग लेटर) देण्यात आले. त्यामुळे अनेक युवकांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
रांजणी व परिसरातील पंचक्रोशीत प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याने स्थानिक युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रवीण थोरात, जिल्हा परिषद सदस्या प्रीती थोरात, तालुका कार्याध्यक्ष गणेश यादव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष केतन वाघ यांनी उपस्थित मान्यवर, टाटा मोटर्सचे अधिकारी तसेच सहभागी युवक-युवती यांचे आभार मानले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada