गावागावातुन
पहाटेच्या काकडा भजनाची टाव्हरेवाडी येथे सांगता.
लोणी धामणी प्रतिनिधी-राजु देवडे
टाव्हरेवाडी ता .आंबेगाव येथील कमलादेवी मंदिरात काकडा भजन आरतीने टाव्हरेवाडी भक्तिमय वातावरणात दुमदुमली कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशी पासून त्रिपुरा पौर्णिमा पर्यंत दररोज गेल्या अनेक वर्षापासून परंपरा जपण्याचं काम ग्रामस्थांनी केलं महिनाभर चालणाऱ्या या काकड आरती साठी अनेक ग्रामस्थ मंडळी महिला शाळेतील मुले, आवर्जून या काकड आरती साठी भजन भूपाळी गात असतात मनाला समाधान स्फूर्ती समाधान या काकडा भजनातून मिळत असते पहाटेच्या वेळी हरिनामा मध्ये भक्तिमय वातावरणात आनंद घेताना दिसतात आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू असलेली पद्धत आहे देवपूजा करताना आरती ही अगदी हमखास गायली जाते आरती ही एक प्रकारे देवासाठी गायली जाणारी स्तुतीसुमणे आहेत जी आपण छान चाल लावून गातो गणेशोत्सव नवरात्र उत्सव या काळात आरती अगदी हमखास गायली जाते परंतु काकड आरतीचे एक वेगळेच महत्व आहे कारण पहाटेची गायली जाते म्हणून त्याला काकड आरती म्हणतात कोणत्याही देवस्थानाला भेट देताना लोक पहाटेची काकड आरती अजिबात चुकत नाही काकड आरती म्हणजे देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती ही आरती करण्यासाठी खास काकड्याने म्हणजे एका विशिष्ट ज्योतीने देवाला ओवाळण्यात येते म्हणून याला काकड आरती म्हणतात काकड आरती समारोप कार्यक्रम ,१५/११/२०२४ त्रिपुरा (कार्तिक )पौर्णिमा या दिवशी संपन्न होतआहे सकाळी पहाटे पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन सकाळी दहा वाजता ह.भ.प. राम महाराज पैठणकर (भागवताचार्य )आळंदी यांची कीर्तन संपन्न होणार आहे साथसंगत गायक मच्छिंद्र महाराज राऊत, दत्ता महाराज आजबे, अशोक महाराज ढोबळे,वादक -गोविंद गोविंद महाराज पिंपळे, यश महाराज आळंदीकर, सात संगत वारकरी शिक्षण संस्था आळंदीत्यानंतर अन्नप्रसादाचा कार्यक्रम होईल यासाठी सर्व ग्रामस्थ हनुमान भजन मंडळ , कमलादेवी हरिपाठ मंडळ, सर्व भाविक भक्त. मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेत असतान कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आंबेगाव तालुका सरपंच परिषद अध्यक्ष उत्तमराव टाव्हरे यांनी केले
गावागावातुन
साहेबराव जगताप यांचे निधन
निंबवी ता. श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर) : निंबवी (ता.श्रींगोदां जि अहिल्या नगर)येथील ठाणे परिवहन विभागातील निवृत्त कर्मचारी साहेबराव हौसेराम जगताप यांचे शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
साहेबराव जगताप हे शांत, मनमिळावू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या जाण्याने एक जेष्ठ मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी . मीना जगताप, मुलगी निलिमा खळे, रजनी मिरके, भाऊ बाजीराव जगताप, मुलगा आकाश जगताप असा परिवार आहे.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता निंबवी येथे जलदान विधी व पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समस्त जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

गावागावातुन
मंचर बस स्थानकाचा कायापालट: ५ कोटी ३६ लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी
माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; बसस्थानक परिसर होणार चकाचक
मंचर (प्रतिनिधी):
आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंचर बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मोठी घोषणा झाली आहे. राज्याचे माजी मंत्री व आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंचर बस स्थानकाच्या विविध कामांसाठी ५ कोटी ३६ लाख २९ हजार ५५९ रुपयांच्या निधीला जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने ‘जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६’ अंतर्गत हे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.
मंजूर झालेली प्रमुख कामे आणि निधी:
मंचर बस स्थानकाच्या आवारात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि पावसाळ्यात होणारा चिखल व धुळीचा त्रास कायमचा संपवण्यासाठी खालील दोन महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत:
१. सिमेंट काँक्रीटीकरण: बस स्थानक परिसरात सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी ५ कोटी १६ लाख २९ हजार ९७० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे स्थानकाचा संपूर्ण परिसर सुसज्ज आणि स्वच्छ होणार आहे.
२.संरक्षक भिंत: स्थानकाच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला १९ लाख ९९ हजार ५८९ रुपये मंजूर झाले आहेत.
मंचर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. बस स्थानकाची दुरवस्था झाल्याने प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन दिलीपरावजी वळसे पाटील यांनी या कामांसाठी विशेष निधी मिळावा म्हणून शासनाकडे आणि जिल्हा नियोजन समितीकडे विशेष आग्रह धरला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आता या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.
“मंचर बस स्थानकाचा परिसर सुसज्ज असावा ही नागरिकांची जुनी मागणी होती. या निधीमुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळतील. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.”
— दिलीपरावजी वळसे पाटील (माजी मंत्री तथा आमदार, आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघ)
गावागावातुन
रांजणी येथे भव्य रोजगार मेळावा; टाटा मोटर्सकडून ५५ युवकांना जागेवर नियुक्तीपत्र
रांजणी (ता. आंबेगाव) – स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रांजणी येथे शनिवार, दिनांक २१ मार्च रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पंचायत समिती सदस्या सौ. प्रियांका केतन वाघ आणि केतन वाघ यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.
या मेळाव्यात देशातील अग्रगण्य वाहननिर्मिती कंपनी टाटा मोटर्स सहभागी झाली होती. कंपनीकडून अरविंद काळे, गोवर्धन पांचाळ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे मुलाखत पथक उपस्थित राहून उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली.
या रोजगार मेळाव्यास सुमारे २५० हून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५५ पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना टाटा मोटर्सकडून जागेवरच नियुक्तीपत्र (जॉइनिंग लेटर) देण्यात आले. त्यामुळे अनेक युवकांच्या रोजगाराचा मार्ग मोकळा झाला आहे.
रांजणी व परिसरातील पंचक्रोशीत प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याने स्थानिक युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रवीण थोरात, जिल्हा परिषद सदस्या प्रीती थोरात, तालुका कार्याध्यक्ष गणेश यादव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष केतन वाघ यांनी उपस्थित मान्यवर, टाटा मोटर्सचे अधिकारी तसेच सहभागी युवक-युवती यांचे आभार मानले.
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन2 years agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक1 year agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
