गावागावातुन
मंत्रीपदावर मी समाधानी , जलसंपदा विभागाच्या माध्यमातून बाळासाहेब विखेपाटील यांचे स्वप्न पूर्ण करणार-मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर दि.२३ प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अतिशय महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्व.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खो-यात आणण्याचे स्वप्न या निमित्ताने पुर्ण करण्याची संधी मिळाली असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर ना.विखे पाटील यांचे अहिल्यानगर येथे प्रथमच आगमन झाले. डॉ.विखे पाटील फौंडेशन येथे जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण आण्णासाहेब हजारे यांचे आशिर्वाद घेतले. त्यांनी केलेल्या सत्काराचाही स्विकार केला. आ.शिवाजीराव कर्डीले, आ.काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मा.आ.अरुणकाका जगताप, नाशिक विभागाचे आयुक्त डॉ.प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर आदिंनी त्यांचे स्वागत केले.
माध्यमांशी बोलताना ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्य मंत्रीमंडळात जलसंपदा विभागाची मिळालेली जबाबदारी ही काम करण्याची एक संधी असून, विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्या जबाबदारीतून स्व.बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पुर्ण करण्याचे दायित्व मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविले आहे. ती जबाबदारी निश्चितपणे यशस्वी करण्यासाठी माझा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले.
कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खो-यात वळविण्यासाठी डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला मसुदा सादर केला होता. त्याचेच आता धोरणात रुपांतर झाले. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता हा महत्वकांक्षी प्रकल्प पुर्ण करणाचे ध्येय ठेवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी पुढाकार घेतल्याने गोदावरीच्या तुटीच्या खो-यात पाणी वळविण्याचे एैतिहासिक काम भविष्यात पुर्ण करण्यासाठी आता वाटचाल असेल. कृष्णा खो-यातील पाणी प्रश्नाबाबतही निश्चित असे धोरण घ्यावे लागेल. बिगर सिंचनाचे वाढते प्रमाण, शेतीच्या पाण्याचे निर्माण होणारे प्रश्न, पाण्याची उधळपट्टी थांबविणे आणि पाणी सोडण्याच्या वितरण व्यवस्थेत चांगली सुधारणा करणे. यासाठी आता काम करावे लागणार असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही, यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षाचा अवतार निवडणूकीतच संपला होता. निवडणूकीच्या दरम्यानच महाविकास आघाडीत बिघाडी सुरु झाली होती. त्यांचे अस्तित्व आता राहीलेले नाही अशी टिका करुन, त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे. यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले आरक्षण कायदेशिरदृष्ट्या टिकले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचे सरकारही सकारात्मकच आहे. मात्र मध्यंतरी महाविकास आघाडी सत्तेवर आल्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गमवावे लागले. आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडी गंभिर नव्हते याचे पाप त्यांच्या डोक्यावर आहे.
राज्यात महायुतीचे सरकार होते त्यावेळी आरक्षणाच्या बाबतीत आवश्यक तेवढे सर्व निर्णय घेण्यात आले होते. मागासवर्ग आयोगाची निर्मिती केली. राज्यात ५८ मोर्चे आणि अनेकांचे बलिदान झाले. पण ही सर्व परिस्थिती संयमाने हाताळण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी केली होती. आताही त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नव्याने सरकार स्थापन झाले आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, चर्चेतुन हा प्रश्न सोडविता येईल. जरांगे पाटलांनी नव्या सरकारला थोडा वेळ दिला पाहीजे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.
बीड आणि परभणी येथील घटनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, या दोन्हीही घटनांबाबत मुख्यमंत्र्यांनी नागपुर आधिवेशनामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या दोन्हीही घटना अतिशय दुर्दैवी असून, दोषी व्यक्तिंवर कारवाई करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. घटनेबाबत आता चौकशी समितीही नेमण्यात आली असून, या घटनेचे आता राजकारण करु नये. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येवून जातील परंतू त्यानंतर निर्माण होणारा सामाजिक तणाव तसेच जातीजातींमध्ये उमटणारे पडसाद याची जबाबदारी ते घेणार का असा सवाल ना.विखे पाटील यांनी उपस्थित केला.
अण्णा हजारे यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत
समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार यांच्या कुटूंबातील विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. डॉ.विखे पाटील फौंडेशनमध्ये पद्मविभूषण आण्णासाहेब हजारे यांच्यासह मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.
गावागावातुन
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद
वळती प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.
मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावागावातुन
फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर दि.१४ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.
निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
गावागावातुन
दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.
पारनेर दि.१० प्रतिनिधी
जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.
अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.
तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.
आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक12 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
