मंचर
पोंदेवाडी ( ता. आंबेगाव) येथील हद्दीतील रोडेवाडी फाटा परिसरात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडे
ऊस घेऊन निघालेला एक ट्रॅक्टर ( दि. २१ ) रोजी दुपारच्या सुमारास पलटी झाला.त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उस पडुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर दुसर्या अपघातात टॅक्टरवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरवर रस्त्यावरुन खाली जाऊन पलटी झाला त्यांच्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
शिरूर तालुक्यातील गावांमधुन अष्टविनायक मार्गाने भिमाशंकर साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक सुरु असते. या मार्गावर ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी जास्त प्रमाणात ऊस भरुन वाहतुक करत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहे.
दि २१ रोजी पोंदेवाडी गावच्या हद्दीततील पहील्या अपघातात एक ट्रॅक्टर दोन ट्रॉलीमध्ये ऊस भरून भीमाशंकर कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर पलटी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दुसर्या अपघातात उसानेने भरलेल्या टॅक्टरवरचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यावरुन खाली गेला आणि अपघात झाला यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
भिमाशंकर साखर कारखान्याचा गळती हंगाम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊसाची वाहतूक सुरु आहे. ट्रॉलीमध्ये अचानक बिघाड होऊन अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत.
याबाबत भिमाशंकर साखर कारखान्याने उस वाहतूकदारांकडे लक्ष देऊन ऊस वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे
