मेंगडेवाडी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

Share

मंचर प्रतिनिधी

मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे ( दि.२३) रोजी
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पेटून उठत हिंदुत्वाची भगवी पताका फडकवत ठेवणारा बुलंद आवाज म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे!
आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे ते नेहमीच चर्चेत रहायचे. एकदा बोललेला शब्द त्यांनी कधी
परत घेतला नाही. त्यांनी पक्ष वाढवला, सत्तेत आणला आणि शेवटपर्यंत आपला झंझावात कायम ठेवला. राज्यभर व जगभर ( दि.२३) जानेवारी रोजी त्यांची जयंती साजरी होत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना न्याय मिळावा, यासाठी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. बाळासाहेब ठाकरे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी घेतलेली भूमिका कधी फिरविली नाही. आपल्या भूमिकेवर कायम ठाम राहणे हा त्यांचा महत्वाचा गुण होता.
ते बोलतानाचं म्हणायचे,”माझे शब्द म्हणजे बंदुकीतली गोळी आहे. एकदा सुटली की सुटली. पुन्हा पाहायचं नाही. कुठे पडली अन् कुणाला लागली” असा त्यांचा ठाकरी बाणा होता. असे युवासेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी यांनी सांगितले यावेळी सांगितले.

माजी उपसरपंच अंकुश मेंगडे, ग्रा.पं. सदस्य विशाल मेंगडे, चेअरमन साईनाथ मेंगडे, सूर्यकांत मेंगडे, श्री गणेश देवस्थान ट्रस्ट मा. उपाध्यक्ष भास्कर मेंगडे, युवा नेते अमोल मेंगडे, किसन बुवा मेंगडे, माऊली मेंगडे, अशोक दांगट, विठ्ठल मेंगडे, कान्हू टाव्हरे, विवेक मेंगडे व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या