लोणी मॅरेथॉन 2025 मोठ्या उत्साहात संपन्न लोणी मॅरेथॉनची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनकडे वाटचाल

Share

मंचर

लोणी ( ता. आंबेगाव ) येथे रविवारी ( 9 फेब्रुवारी) पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत, फ्री रनर्स ग्रुप आयोजित आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी संचलित मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. 3 किमी,5 किमी 10 किमी आणि 21 किमी अशा चार प्रकारात ही स्पर्धा पार पडली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पार पडलेली स्पर्धा बहुतेक जिल्ह्यात पहिली असावी. या स्पर्धेसाठी साधारणपणे साडेतीन हजार स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.

विशेष म्हणजे इथिओपिया या देशातील दोन स्पर्धक स्पर्धे करता सहभागी झाले होते. राजस्थान, हरियाणा,उत्तर प्रदेश या राज्यातील देखील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून स्पर्धेत स्पर्धक सहभागी झाले होते. पुनीत बालन ग्रुप पुणे, फ्री रनर्स पुणे आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी,लोणी हे या स्पर्धेचे आयोजन केले होते.

प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टी-शर्ट, मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांसाठी राहण्याची व्यवस्था शाळेमध्ये माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीने केलेली होती. माणिकचंद ऑक्झरीच यांच्या वतीने सर्व स्पर्धकांना मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती.

21 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी करण्यात आली. त्यानंतर क्रमाक्रमाने इतर स्पर्धेतील स्पर्धकांना सोडण्यात आले. लहान मुलांपासून ९० वर्षाच्या वयो वृद्धापर्यंतच्या सर्व गटातील लोकांनी आकर्षक वेशभूषा करूनही सहभाग नोंदवला. स्पर्धकांचा तणाव हलका करण्यासाठी झुंबा नृत्याच्या माध्यमातून व्यायाम प्रकार करून घेण्यात आले.

यावेळी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी मालिका अभिनेते हार्दिक जोशी हे देखील आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी त्यांच्या गाजलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील संवादही त्यांनी प्रेक्षकांना म्हणून दाखवला.

बक्षीस वितरण प्रसंगी आमदार दिलीप वळसे पाटील, गुजरात भाजपचे ज्येष्ठ नेते अतुल ब्रह्मभट आणि पुणे जिल्हा भाजपचे नेते ताराचंद कराळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यावेळी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमासाठी निरंकार आर्ट्स पुणे, जनकल्याण पतसंस्था लोणी आणि आदित्य कन्स्ट्रक्शन पुणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी अर्थसाह्य केले. स्पर्धेचे मुख्य स्पर्धा संयोजक राजेश वाळुंज यांनी नियोजनाची धुरा सांभाळली. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज,खजिनदार बाळासाहेब गायकवाड तसेच मंत्रालयातील सहसचिव कैलास गायकवाड, सरपंच सावळाभाऊ नाईक, राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी किसन गायकवाड, मयूर लोखंडे, नवनीत सिनलकर, पांडुरंग वाळुंज, संतोष पडवळ, अविनाश वाळुंज, प्रकाश वाळुंज हे प्रबोधिनीचे सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रप्रेमी युवक मंडळ लोणी तसेच लोणी गावातील विविध युवक मंडळांनी मेरे तो स्पर्धेसाठी सहकार्य केले. स्पर्धेसाठी विविध तालुक्यातील जवळपास 50 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभागी नोंदवला.

यावेळी धामणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बिरारी, लोणी गावातील डॉ. चंद्रकांत देशमुख, डॉ. रसिक काळे, डॉ.भास्कर भोसले, डॉ. संजय सिनलकर यांनी वैद्यकीय विभागाची जबाबदारी सांभाळली.
यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले,” ही मॅरेथॉन स्पर्धा लोणी गावाच्या लौकिकात आणि वैभवात भर घालणारी असून या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू तसेच या संदर्भात कोणत्याही अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी पूर्ण मदत केली जाईल. असे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले

यावेळी लोणी गावचे सरपंच सावळेराम नाईक,शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, पुनीत बालन ग्रुपचे सदस्य चेतन लोखंडे,जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाळुंज पाटील, उपसरपंच स्वाती वाळुंज, माजी सरपंच उद्धव लंके,दिलीप वाळुंज माजी उपसरपंच प्रकाश गायकवाड आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश वाळुंज आणि ऋतुजा इंगळे यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या