लोणी येथे अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

Share

मंचर

लोणी (ता.आंबेगाव ) येथे महाशिवरात्र निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाच्या ५२ वर्षानिमित्त बुधवार (दि .:१९) ते गुरूवार (दि:२७) पर्यंत कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित सप्ताह काळात दररोज फाटे ४ ते ६ काकडा आरती, अखंड विना वादन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, व रात्री ७ ते ९ हरिकीर्तन, नऊ वाजता महाप्रसाद व रात्री १० नंतर हरिजागर हे कार्यक्रम आयोजित केले आहे.

बुधवार (दि.१९) ते बुधवार (दि.२६) या काळात दत्तात्रम महाराज सिनलकर, ज्ञानेश्वर महाराज ढगे पटील, किसन महाराज तांबे,हनुमंत महाराज पोखरकर,नंदा आढाव, नितीन महाराज सुक्रे,श्रीराम महाराज वाळूंज, मच्छिंद्र महाराज राजगुडे यांची अनुक्रमे प्रवचन होतील. तर बुधवार ( दि.१९) पोपट महाराज कासारखेडेकर, गुरुवार ( दि.२०) केशव महाराज हगपणे, शुक्रवार (दि.२१) डॉ. ज्ञानेश्वर महाराज थोरात, शनिवार (दि.२२) बाळासाहेब महाराज रंजाळे, रविवार (दि.२३) ज्ञानेश्वर महाराज कदम- छोटे माऊली, सोमवार (दि.२४) एकनाथ महाराज सदगीर, मंगळवार (दि.२५) भरत महाराज थोरात, बुधवार (दि.२६) मनोहर महाराज शिनारे तर गुरुवार (दि.२७) रोजी सकाळी ८-३० ते १०-३० वाजता बाळकृष्ण महाराज गोगावले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

दररोज हरिकीर्तन संपल्यानंतर रात्री ९ वाजता सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.अशी माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या