मंचर
आंबेगावच्या पूर्व भागात वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी पोंदेवाडी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला होता ( दि.२६) रोजी वडगावपीर येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने या परिसरातील शेती, रस्ते, रस्तेवरील पुल वाहून गेले आहे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री.विवेकदादा वळसे पाटील यांनी ( दि. २७ ) रोजी आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील वडगावपीर येथील गुळवेवस्ती येथील रस्ता पोखरकरमळा क्रमांक २ येथील राहाते घराची दुरावस्था तसेच वाळुंज नगर येथील स्मशानभूमी जवळील भाग, वाहतुकीचे रस्ते, शेती बांधाचे झालेल्या नुकसानांची पहाणी विवेक वळसे पाटील यांनी केली यावेळी नायब तहसीलदार शांताराम किरवे, महसूल मंडल अधिकारी शिंदे, तलाठी शशांक चौंदते, ख. वि. संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, प.स.सदस्य रवींद्र करंजखेले, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, माजी सरपंच उध्दव लंके, उद्योजक वसंत पडवळ, माजी सरपंच संजय पोखरकर, अण्णा पोखरकर, बाळशीराम वाळुंज, सुमित वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.

