Connect with us

गावागावातुन

अहील्यादेवीच्या विचारांचा सांस्कृतिक महोत्सव सुरू करणार – ना.राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

अहील्यानगर दि.३० प्रतिनिधी

अहील्यादेवीच्या विचारांशी सुसंगत असा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून जिल्ह्यचा सांस्कृतिक नावलौकीक अधिक उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून झाला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीचे औचित्य साधून विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहील्यानगर गौरव आणि पालकमंत्री महोत्सवाचे उद्घाटन ना.विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहील्यादेवी होळकर यांचे नाव देवून जिल्ह्याचा गौरव झाला.मात्र अहील्यादेवी मांडलेल्या विचारांचा वस्तूपाठ नव्या पिढी समोर आणायचा असेल तर त्यांच्या विचाराने आपल्याला वाटचाल करावी लागेल.

अहील्यादेवी होळकर यांचा जीवनपट भारतीय इतिहासातील एक तेजस्वी अध्याय असल्याचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,त्यांचे कार्य केवळ राज्यापुरते सिमीत नव्हते तर संपूर्ण भारत वर्षासाठी प्रेरणादायी ठरले.धर्म न्याय आणि सामाजिक सुधारणा आणि भारतीय संस्कृतीचे पुनरूत्थान करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे.

जिल्ह्याचा सुपूत्री असल्याचा अभिमान आपल्या सर्वाना आहेच,परंतू यापेक्षाही महत्वाचे म्हणजे सामाजिक सुधारणातून महीलांच्या सबलीकरणाचा पाया त्यांनी अधिक मजबूत केला.हीच प्रेरणा घेवून शहरामध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारून महीलासांठी काम सूरू करणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.

जिल्हयाला लाभलेला सांस्कृतिक वारसा या महोत्सवातून अधोरेखीत झाला असून,जिल्हयातील कलाकारांनी यामध्ये दिलेलै योगदान खूप कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

अहील्यादेवीच्या प्रत्येक जयंतीदिनाला असा महोत्सव आयोजित करून हा जिल्हा अहील्यादेवी होळकर यांच्या विचारांवर वाटचाल करणारा असल्याचा संदेश देण्यासाठी भविष्यात प्रयत्नशील राहण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

महोत्सवात झालेल्या यशस्वी स्पर्धक आणि कलाकारांचा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास विचार भारतीचे राजाभाऊ मुळे अरूण कुलकर्णी महोत्सव समितीच्या सौ.धनश्री विखे पाटील माजी महपौर बबासाहेब वाकळे,निखिल वारे,धनंजय जाधव यांच्यासह विचार भारतीचे तसेच महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे सलग चौथा बिबट्या जेरबंद

Published

on

Share

वळती प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात वनविभागाने मोठी कारवाई करत महिनाभरात सलग चौथा बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पवार मळा परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नागापूर गावातील प्रसिद्ध थापलिंग देवस्थानाच्या पश्चिमेकडील पवार मळा परिसरात वनविभागाने तीन पिंजरे लावले होते. यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एक मादी बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला एक बछडा पिंजऱ्यात अडकला. पुढे २७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री आणखी एक मादी जेरबंद झाली. तर २ मार्च रोजी अंदाजे १५ महिन्यांचा नर बछडा देखील पिंजऱ्यात सापडला. या सर्व घटनांची माहिती नागापूरचे सरपंच सुनील शिंदे यांनी वनविभागाला दिली होती.


मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी फुलमाळी व वनरक्षक बालाजी पोत्रे यांनी संबंधित बिबट्यांना सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून नागापूर परिसरात जनावरांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. तसेच बिबट्यांच्या वारंवार हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सलग चौथा बिबट्या जेरबंद झाल्याने नागापूर परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच जनावरे सुरक्षित बांधून ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading

गावागावातुन

दुष्काळमुक्त करण्याची घोषणा केली पण निधी दिला नाही.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधांवर टीका.

Published

on

Share

पारनेर दि.१० प्रतिनिधी

जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे हटले, आशी घणाघाती टिका जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तालुक्यातील ४९
गावांसाठीच्या सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अतंर्गत कुकडी कालव्याच्या कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.महायुती सरकारने एकूण ४००कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून,पहील्या टप्प्यातील १ते ६०किलो मीटरच्या कामासाठी ८२ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे.वर्षभरात ही सर्व काम पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.आ.काशिनाथ दाते आ.शरद सोनवणे जेष्ठ नेते बबनराव पाचपुते डाॅ.सुजय विखे पाटील मुख्य अभियंता संजीलनव चोपडे अधिक्षक अभियंता अलका अहीरराव राहूल शिंदे विश्वनाथ कोरडे विजयराव औटी सचिन वराळ आदी याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे म्हणाले की,१९८२ सालापासून या कालव्यांना निधी मिळाला नाही.अनेकांनी इथे येवून फक्त भाषण केली.कालव्याच्या कामाला निधी उपलब्ध न झाल्याने चाळीस टक्के पाण्याची गळती होत आहे.१८००क्युसेसने वाहाणारा कालवा आज १४००क्युसेसवर आला.शेवटच्या गावाला पाणी मिळायचे असेलतर कालव्यांची काम केल्याशिवाय पर्याय नव्हता.जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर या कामाला आपण प्राधान्य दिले असून वर्षानुवर्ष पाण्यासाठी संघर्ष कराव्या लागणार्या गावांना काम करून न्याय द्यायचा आणि खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणे ही भूमिका महायुती सरकारची आहे.

अनेक वर्ष पाण्यापासून या भागाला वंचित ठेवले.पाणी असेल तर विकास आहे.रेडबुल वाटून विकास होणार नसल्याचा टोला लगावून तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विकण्याची वेळ कोणी आणली.कामगार देशोधडीला कोणी लावले.मुंबईत बसून कारखाने चालतात का असा सवाल उपस्थित केला. प्रयत्न करून कारखान्याची विक्री थांबवली.तालुक्याला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहीला पाहीजे आशी ठाम भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.

तालुक्यातील ४९गावांकरीता सहा उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असल्याची माहीती देवून योजनांच्या सर्वेक्षणासाठी १कोटी ८५ लाख रुपयांचा निधी दिल्याचे विखे पाटील म्हणाले.

आ.काशिनाथ दाते यांनी आपल्या भाषणात वर्षानुवर्ष दुर्लक्षित झालेल्या कामांना मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून गती मिळाली.ही सर्व काम निर्धारीत वेळेत पूर्ण झाली तर दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे आहे.आ.शरद सोनवणे यांनी कालव्यांच्या कामाची सुरूवात म्हणजे दुष्काळी भागात जलक्रांती आहे.आम्ही पाणी मिळू देत नाही या आरोपातून मुक्तता झाल्याची प्रतिक्रीया आपल्या भाषणात करून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून मोठे सहकार्य विखे पाटील यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada