मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी खडकी ( ता. आंबेगाव) येथील विशाल वाबळे यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे यांनी हे निवडीचे पत्र विशाल वाबळे यांना दिले .मंचर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष मेळाव्यात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, युवक अध्यक्ष प्रमोद सिंह गोतारणे, दामु घोडे व आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर निवडीचे पत्र दिले आहे.

यावेळी सत्काराला उत्तर देताना विशाल वाबळे म्हटले की आंबेगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये संघटनात्मक कामाला प्रथम प्राधान्य देवुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम मी करणार आहे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे घराघरात पोहचवणार असल्याचे विशाल वाबळे यांनी निवडीनंतर सांगितले.
विशाल वाबळे यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ अमोल कोल्हेच्या प्रचारात महत्वाची भूमिका बजावली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासोबत ते सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असतात . विशाल वाबळे यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरात उन अभिनंदन होत आहे.
