मंचर
पिंपळगाव खडकी ( ता. आंबेगाव ) येथील ॲड श्रीराम सुर्यकांत बांगर यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ( उत्तर ) कायदा आघाडी जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे, संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्हा ( उत्तर ) कायदा आघाडी जिल्हाध्यक्षपदी बांगर यांची निवड झाली बांगर यांच्या निवडीचे आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन स्वागत करण्यात आले.
