मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कट..? विनोद तावडे, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा

Share

मुंबई (प्रतिनिधी)

महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आहे.मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे नेते tविनोद तावडे यांची बंद दाराआडा चर्चा झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ होणार असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा पत्ता कट होऊन भाजपा मधील मराठा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे.मराठा चेहरा मुख्यमंत्री करायचे ठरल्यास विनोद तावडे किंवा राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार होऊ शकतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री..

कमी संख्याबळ असताना भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदी संधी देत भाजप दोन पावलं मागे आले होते. त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाली होती .यावेळी मात्र भाजप राज्यातला पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे . म्हणूनच भाजपच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा आहे . मुख्यमंत्रीपदी भाजपचा नेता असावा .
सुधीर मुनगंटीवार यांनीही काल अमित शहा यांची भेट घेऊन मुंबईत परतल्यानंतर मोठे वक्तव्य केले होते. वरिष्ठ ठरवतील तो आमचा मुख्यमंत्री असेल असं म्हणत त्यांनी एक प्रकारे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्यास विरोध असल्याचे जाहीर केले होते.त्यानंतर अमित शहा व विनोद तावडे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राला देण्यावरुन खलबतं झाल्याची सुत्रांची माहीती आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला आणि विशेषता भाजपला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा मोठा फटका बसला होता . मनोज जंरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत थेट भाजप विरोधात भूमिका घेतली होती. या विधानसभेला मनोज जंरांगे पाटील निवडणुकीत उमेदवार उतरवतील अशी चर्चा होती. मनोज जंरांगे पाटलांनी ऐनवेळी माघार घेतल्याने मराठा समाजामध्ये मत भिन्नता दिसून आली. आणि त्याचा फायदा महायुतीला मिळाला असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत पुढे आला आहे .त्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा आहे . देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी शक्यता असताना विनोद तावडे आणि अमित शहा यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदासोबत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे .दिल्लीमध्ये अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये मराठा मुख्यमंत्री केल्यास काय होईल..? त्याचे काय परिणाम होतील का? या बाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे . महाराष्ट्रात सरकार स्थापण्यापूर्वी अमित शहा व विनोद तावडे यांच्यामध्ये जी बैठक झाली. जवळपास 40 मिनिटे बैठक चालली 40 मिनिटांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात मराठा समाजाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री पदावर संधी दिली नाही.तर भाजपला पुढच्या राजकारणात काही फटका बसेल का..? यावर अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे .बिगर मराठा मुख्यमंत्री केला तर मराठा समाजाची मते भाजपापासुन दुरावली जातील का..? याबाबत भाजपमध्ये सध्या चर्चा सुरू आहे.

मराठा मुख्यमंत्री करायचा ठरला तर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाईल. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी विनोद तावडे किंवा राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार यांच्यावर सोपवली जाऊ शकते .. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे . असे असले तरी अजुन अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याची शक्यता आहे.

Related Articles

ताज्या बातम्या