मंचर (प्रतिनिधी)
देवदत्त निकम आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार व्हावे. यासाठी पिंपरखेड ता. शिरूर जिल्हा पुणे येथील दोन कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञा केली होती. देवदत्त निकम आमदार झाल्यानंतर केस कापणार तर दुसऱ्या कार्यकर्त्यांने देवदत्त निकम आमदार झाल्यानंतरच चप्पल घालणार ! अशा प्रकारच्या प्रतिज्ञा केल्या होत्या .
आज देवदत्त निकम यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरखेड (ता. शिरूर) येथे श्री दत्त विद्यालयांमध्ये व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान देवदत्त निकम यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडले.
यावेळी देवदत्त निकम यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आपलाच विजय झाला आहे. विरोधकांनी कटकारस्थान करुन तो हिरावून घेतला आहे. त्यामुळे या प्रतिज्ञा करणाऱ्या एका कार्यकर्त्यांला निकम यांनी स्वतः चप्पल घेऊन देऊन परिधान करायला लावली.तर दुसऱ्या कार्यकर्त्याला विनंती करून केस कापायला लावले.
पिंपरखेड तालुका शिरूर येथील कार्यकर्ते शरद रोहिदास बोंबे यांनी देवदत्त निकम हे आमदार होईपर्यंत केस कापणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती तर दुसरे कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे नेते माऊली ढोमे यांनी देवदत्त निकम यांना आमदार करणार मगच चप्पल घालणार अशी प्रतिज्ञा केली होती.
तुम्ही तुमची प्रतिज्ञा मागे घ्यावी अशी विनंती केली. यावेळी माऊली ढोमे यांना देवदत्त निकम यांनी चप्पल परिधान करायला लावली. तर शरद रोहिदास बोंबे यांना सलुन मध्ये नेऊन केस कापण्यास भाग पाडले.
मात्र देवदत्त निकम यांचा थोड्याशा मतावरून पराभव झाल्याने. या एका कार्यकर्त्यांला आता पायात चप्पल घालायला मिळणार नाही. तर दुसऱ्या कार्यकर्ता केसच कापणार नाही . असे वाटत असताना आज पिंपरखेड या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते आंबेगाव विधानसभेचे उमेदवार देवदत्त निकम यांचा वाढदिवस आयोजित करण्यात आला होता श्रीदत्त विद्यालय पिंपरखेड येथे प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान यावेळी आयोजित केले होते या व्याख्यान वेळी देवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांना विनंती केली की देवदत्त शिवाजीराव निकम यांच्या ट्रंपेट चिन्हाला पडलेल्या मतामुळे आपला कागदावर विजय दिसत नसला. तरी आपणच विजयी आहोत.
यावेळी बोलताना देवदत्त निकम यांनी सांगितले की हा आमचा विजय आहे .कट कारस्थान करून हा विजय हिरावून घेण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज न होता देवदत्त निकम या नावाला पडलेली मते विजयी उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या पेक्षा नक्कीच जास्त आहेत .त्यामुळे या कार्यकर्त्यांनी आपली प्रतिज्ञा मागे घ्यावी अशी विनंती केली आणि कार्यकर्ते शरद बोंबे व माऊली ढोमे यांनी त्यांच्या विनंतीला मान दिला.
