नगर (प्रतिनिधी)
शेतकरी संघटनेने जून २०२४ मध्ये दुधाला दर वाढवुन मिळावा यासाठी आंदोलन केले होते.आंदोलना नंतर दुधाचे दर पडले किंवा पाडण्याचा प्रयत्न होत आहे .दूध दरवाढीच्या प्रश्ना संदर्भात ठोस भूमिका घेण्याकरिता आज श्रीरामपूर येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नव्या सरकारने दुधाच्या संदर्भातील कायदा विधानसभेत मांडावा दुधाला किमान ४० रुपयांचा दर आणि भेसळ थांबवावी याचे नियोजन करणारा कायदा निर्माण करावा.
याकरिता नवनिर्वाचित २८८ आमदारांना पत्रव्यवहार करणार असून नव्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढावा निवडणुकी अगोदर दिलेल्या संपूर्ण कर्जमाफी सह दूध दरवाढी संदर्भातील दिलेल्या आश्वासनांची १५ दिवसात अंमलबजावणी करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे
यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते शासनाने यावर कायदा न केल्यास राज्यात दूध दरवाढीबाबत आणि संपूर्ण कर्जमाफी बाबत मोठे जन आंदोलन उभारणार असल्याचे यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केले
शेतकरी उत्पादित करत असलेल्या दुधाला प्रति लिटर 25 ते 30 रुपये बाजार भाव मिळतो. हा बाजारभाव पुरेसा नाही.एक लिटर दूध उत्पादन करायला तेवढाच खर्च येत असल्याने शेतकरी तोट्यामध्ये दूध उत्पादक करत आहे .याकडे सरकारचे वारंवार लक्ष वेधूनही सरकार याबाबत कोणतीच उपाययोजना करत नाही. शेतकऱ्यांनी कंपनीला किंवा डेअरीला 20 ते 25 रुपये विकलेले दूध बाजारामध्ये कंपनी ब्रॅण्डिंग करून ते पन्नास ते साठ रुपयाला विकत असते आणि भरपूर नफा कमावते. याकडे शासन पद्धतशीरपणे, डोळे झाक करत आहे. शेतकरी त्यामुळे कर्जबाजारी होत आहे यावर शासनाने कायदा करावा आणि दुधाला किमान 40 रुपये बाजार भाव द्यावा यासाठी 288 आमदारांना पत्र लिहून विनंती करण्याचा ठराव श्रीरामपूर येथे शेतकरी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.1
