उदगीर (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यतल्या उदगीर शहरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं उदगीर शहरात सध्या भितिचे वातावरण पसरले आहे . उदगीर शहरातील पारकटी गल्ली येथील बागबंदे यांच्या घरातील आंगनात पहाटे साडेपाच च्या सुमारास एक बिबट्या कंपाउंड वरुन उड़ी मारून आल्याचे सीसीटीवी फुटेज मध्ये दिसत आहे.
त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . वन विभागाने या भागात पिंजरा लावुन बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे .

महाराष्ट्राच्या पश्चिम डोंगर रांगांमध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव जुन्नर तालुक्यात आढळणारा बिबट्या मराठवाड्यातील शहरातील मानवी वस्तीमध्ये आढळु लागले आहेत. त्यामुळे बिबट्याला मानवी वस्तीमध्ये येऊ न देण्यासाठी योग्य कार्यवाही शासनाने करावी अशी मागणी होत आहे
उदगीर शहरातील बिबट्या घरात शिरल्याचा सीसीटीवी व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे .
