सोलापूर (प्रतिनिधी)
: विधिमंडळ गटनेते म्हणून भारतीय जनता पक्षाकडुन देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली .ही निवड होताच सोलापुरात भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
सोलापुरातील भाजपा कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते एकत्रित जमले.यावेळी पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत, एकमेकांना मिठाई भरवून ढोल तश्याच्या गजरात ठेका धरत जल्लोष केला.
उद्या देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील आणि राज्यात राहिलेली विकास कामे मार्गी लावतील असा विश्वास या निमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याने महाराष्ट्रातील भाजपचे सर्वच कार्यकर्ते आंनदी आहेत. भाजपाकडे पुर्ण बहुमत असल्याने भारतीय जनता पक्षाला अपेक्षित निर्णय घ्यायला अडथळे येणार नाहीत. सत्तेत असल्याने पक्षवाढीसाठी मदत होणार आहे.
