देशविदेश
ईव्हीएम विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावे – प्रकाश आंबेडकर
अकोले प्रतिनिधी
ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीनेही एल्गार पुकारला आहे. इ व्ही एम बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे.ईव्हीएम वर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टाने जी याचिका खारीज केली ती न्यायाला धरून नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, सुप्रीम कोर्टाला कुठली सिस्टीम लागू करावी किंवा लागू करू नये याबाबत अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर नोंदणीकृत पक्षांना कुठली सिस्टीम पाहिजे किंवा नाही त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असता तर मी मान्य केले असते.असे आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
तर काँग्रेसने देशव्यापी यात्रा काढण्याची अजिबात गरज नाही. पार्लमेंटने अनेक रस्ते पक्षांना मोकळे करून दिलेले आहेत. पाहिजे ती सिस्टीम ते वापरू शकतात. जर काँग्रेस ने सर्वांना बोलावलं नाही तर आम्ही पुढाकार घेऊ आणि सर्व पक्षांकडे पर्याय ठेऊ . अशी भुमिका आंबेडकर यांनी मांडली मतदार वाढी संदर्भात सुप्रीम कोर्टात जाणारे हे भाजपचे पिल्लू असल्याचे म्हटले आहे.
ईव्हीएम विरोधात एकत्र येण्यासाठी काँग्रेस ने पुढाकार नाही घेतला तर आम्ही पुढाकार घेऊ 10 तारखेपर्यंत वाट पाहू..?यावर चर्चा तरी करा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तर महापरिनिर्वाण दिना मूळे रेल्वेने जे प्लॅटफॉर्म तिकीट बंद केले आहे .त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले त्यांनी देशाचा मोठा रेव्हेन्यू बुडवला आहे
गावागावातुन
पुणे जिल्हा परिषदेचा गलथान कारभार .. गावाला त्रास , सरपंच दिपक पोखरकर यांचे अर्धनग्न होत आंदोलन
मंचर (प्रतिनिधी)
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मंचर निरगुडसर रस्त्यावर पिंपळगाव तर्फे महाळुंगे गावाच्या लगत मंजूर असणारे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे कामाची सुरुवात केली. गावानजीक असणारा उतार कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ता खोदाई करून तो मुरूम व माती काढून टाकली आहे .त्यानंतर गेले एक ते दीड महिना काम बंद असल्याने या रस्त्यावर उडणार्या धुळीचा त्रास पिंपळगाव ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे . तक्रारी करुन पाठपुरावा करुनही रस्त्याचे काम सुरू होत नाही.
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानेच या रस्ताचे काम रखडल्याचे सांगत पिंपळगाव खडकी गावचे सरपंच दिपक पोखरकर यांनी अर्ध नग्न होत आज ग्रामस्थां समवेत आंदोलन केले. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे .या गलथान कारभारामुळे पिंपळगाव ग्रामस्थांना रोज होत असणारा त्रास कधी बंद होणार आहे. असा प्रश्न सरपंच दिपक पोखरकर व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे
मंचर निरगुडसर रस्त्यावर तुकानाना चौक ते पिंपळगाव खडकी जिल्हा मार्ग क्रमांक २४ या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दीड कोटी रुपये निधी मंजूर केला आहे .सदर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणार आहे . त्यासाठी निविदा होऊन ठेकेदार ठरविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सदर ठेकेदाराने पिंपळगाव गावालगतच्या रस्त्यावर असणारा चढ कमी करण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे.
या केलेल्या खोदकामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गावात राहणाऱ्या नागरिकांना व शाळेत येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर उडणार्या धुळीमुळे त्रास सहन करावा लागत आहे .
गेली एक ते दीड महिना त्रास सहन करून थकलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केल्याने सरपंच दिपक पोखरकर यांनी बांधकाम विभाग जिल्हा परिषद पुणे यांचे उपअभियंता महेश परदेशी यांच्याशी वारंवार संपर्क करुन रस्ता दुरुस्त करण्याचे काम लवकरात लवकर सुरू करा अशी विनंती केली .मात्र उपअभियंता परदेशी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा सरपंच दिपक पोखरकर यांनी आरोप केला आहे.
ठेकेदाराची अरेरावी.. सरपंचांचा आरोप
सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे तेथे दररोज पाणी मारण्यात यावे . या रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करावे असे ठेकेदाराला सांगूनही संबंधित कामाचा ठेकेदार अरेरावी करत आहे. वारंवार सांगुणही काम सुरू करत नाही. रस्त्यावर धुळ उडत आहे. तेथे पाणी मारायला सांगुणही ठेकेदार पाणी मारत नाही. पुणे जिल्हा परिषदेचे अधिकारीही ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत.असा आरोपही सरपंच दिपक पोखरकर यांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या अडचणी
पिंपळगाव खडकी येथील खोदाई केलेल्या रस्त्यालगत काही ग्रामस्थांच्या हरकती आहेत त्यामुळे काम सुरू होत नाही. उप अभियंता महेश परदेशी यांनी या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असताना ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सरपंच दिपक पोखरकर यांनी आंदोलन करतेवेळी सांगितले
खोदाई केल्यानंतर निघालेल्या माती व मुरुमाचे जिल्हा परिषदने काय केले..?
पिंपळगाव खडकी गावादरम्यान काँक्रीट रस्ता करण्यासाठी उतार कमी करण्यासाठी खोदाई करून निघालेले माती व मुरूम याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने काय केले..? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सदर खोदाई करताना जिल्हा परिषदेने महसूल विभागाची परवानगी घेतली होती का..? सदर खोदाई मधून निघालेल्या माती मुरमाची रॉयल्टी शासनाला जमा करण्यात आली आहे का..? सदर माती मुरूम वाहतूक करताना महसूल विभागांने परवानगी दिली होती का..? याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
कोण आहेत उपअभियंता महेश परदेशी ..?
पिंपळगाव खडकी येथील कामात उपअभियंता हलगर्जीपणा करत आहेत असा आरोप केला आहे. सरपंच दिपक पोखरकर यांनी आरोप केलेले उपअभियंता महेश परदेशी नक्की कोण आहेत…? असा प्रश्न उपस्थित केला .तेव्हा माहीती घेतली असता
महेश परदेशी हे अहील्यानगर जिल्ह्यातून आंबेगाव सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून 2018-19 मध्ये रुजू झाले. त्यांनी आंबेगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून अंदाजे तीन वर्षे काम केले. आंबेगाव तालुक्यात काम करत असताना त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील कामाची ही जबाबदारी दिली जायची.त्यानंतर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून बढती मिळाली विशेष म्हणजे बढती मिळाल्यानंतरही त्यांना उपअभियंता म्हणून जुन्नर आंबेगाव पंचायत समितीचा कार्यभार मिळाला अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना बढती मिळाल्यानंतर त्यांची बदली कार्यरत जिल्ह्याबाहेर होत असते.
मात्र महेश परदेशी आंबेगाव तालुक्यात शाखा अभियंता होते आणि पुन्हा लगेचच त्यांची उपअभियंता म्हणून आंबेगाव मध्येच बढती झाली. त्यांचे शासकीय पातळीवर अधिकाऱ्यांमध्ये चांगले संबंध आहेत त्यांना राजकीय पाठबळ असल्याचीही चर्चा आहे .त्यामुळे ते आंबेगाव तालुक्यात व जुन्नर तालुक्यात उप अभियंता म्हणून राजे शाही पणे काम करत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या सोबतीला नेहमी विशेष राजकीय लोकांचाही गराडा असतो.
सरपंच पोखरकर यांचे अर्धनग्न आंदोलन पिंपळगावकरांना त्रासापासून वाचवेल का ..?
खराब रस्ता चांगला होईल आणि आपल्या गावांमधून जाणाऱ्या वाहन चालकांना व ग्रामस्थांना चांगला रस्ता तयार होईल.. अशा अपेक्षेने सरपंच दिपक पोखरकर यांनी सदर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी शासन दरबारी व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रस्त्याचे काम सुरू झाले मात्र ते शासनातील काही अधिकार्यांच्या अनास्थेमुळे बंद पडले आहे का? चांगला रस्ता मिळावा यासाठी केलेला अट्टाहास पुर्ण होण्याऐवजी मिळण्याऐवजी मानसिक त्रास आणि धुळीचा त्रास पिंपळगावकरांना सोसावा लागला आहे. त्यामुळे अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ सरपंचांवर आली आहे. सरपंच दिपक पोखरकर व ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन करूनही हा रस्ता कधी सुरू होणार याबाबत पिंपळगाव ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत आहेत.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या रखडलेल्या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे.अशी अपेक्षाही पिंपळगाव ग्रामस्थांनी आंदोलनावेळी बोलून दाखवली आहे. त्यामुळे पिंपळगाव करांना सरपंचाच्या आंदोलनानंतर तरी त्रास बंद होईल का? हे आगामी काळात पहावे लागेल.
गावागावातुन
इंडिया आघाडीच्या आंदोलनात खासदार नीलेश लंके यांचा सहभाग
संतोष देशमुख हत्या, बांगलादेशातील अत्याचाराविरोधात आंदोलन
नगर : प्रतिनिधी
बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अमानुष हत्या तसेच बांगलादेशातील हिंदू व ख्रिश्चन बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या कामकाजास सुरूवात होण्यापूव संसदेसमोर आंदोलन केले. नगरचे खासदार नीलेश लंके हे या आंदोलनात सहभागी झाले होते.
हत्येचा आरोप असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, खुनाचे कारण असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपींना हत्येच्या गुन्हयात आरोपी करा, आरोपींना अटक करून खटला अंडर ट्रायल चालवा, अशा प्रकारच्या खंडणी, अपहरण, छळ, खुनाच्या सर्व गुन्हयांचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडून करण्यात यावा, बीड जिल्हयामध्ये कायद्याचे राज्य स्थापन करा अशा मागण्या यावेळी इंडिया आघाडीच्या खासदारांकडून करण्यात आल्या.
बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचारावर केंद्र सरकार बोलत नाही म्हणून खासदारांनी हातात बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्या पाठीशी उभे रहा असे लिहिलेल्या बॅग हाती घेत आंदोलन केले. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधीही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
गावागावातुन
हर्बल युनिक राउंडर्स शिरदाळे प्रिमीयर लीगचे मानकरी तर ऑक्सिनाईल वॉटर फायटर्स ठरले उपविजेते
मंचर प्रतिनिधी
शिरदाळे (ता. आंबेगाव ) येथे वृक्षवल्ली आम्हा सोयरे व समस्त ग्रामस्थ शिरदाळे यांनी आयोजित केलेली एकदिवसीय क्रिकेट संपन्न झाली.अखंड हरिनाम सप्ताह व चंपाषष्ठी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सात संघांनी सहभाग घेतला लीग पद्धतीने ही स्पर्धा पार पडली.
सर्व संघांना संघमालकांद्वारे संघ देऊन त्यांना प्रोफेशनल क्रिकेट किट देण्यात आले होते.या स्पर्धेचा विजेता ठरलेला संघ होता हर्बल युनिक राउंडर्स गावठाण या संघाचे संघमालक होते हर्बल ग्रुपचे सर्वेसर्वा बिपीन चौधरी आणि स्वप्नील केरभाऊ तांबे,उपविजेता ठरलेला संघ होता ऑक्सिनाईल वॉटर फायटर्स या संघाचे मालक होते ऑक्सिनाईल वॉटर फिल्टरचे मालक योगेश तांबे,तृतीय क्रमांक मिळवलेला संघ होता सागदरा सुपर जायंट या संघाचे संघमालक होते वाघेश्वर डेअरीचे मालक दत्ता रणपिसे तर समर्थ पेंट्सचे मालक देविदास रणपिसे,चतुर्थ क्रमांक मिळवला तो शिकोबा टायगर्स या संघाने या संघाचे मालक होते उद्योजक अशोक काचोळे हे चार संघ बक्षीस पात्र ठरले.
स्पर्धेत इतरही तीन संघ सहभागी होते.सप्तशृंगी फायटर्स या संघाचे संघमालक होते महेश चौधरी व स्वप्नील तांबे. बुरुंजवाडा सुपर किंग संघाचे संघमालक होते,अशोक महादू तांबे स्पर्धेमध्ये शेवटचा संघ होता तो वनदेव नाईट रायडर्स या संघाचे संघमालक होते विशाल तांबे आणि गणेश सखाराम तांबे. आशा या सातही संघांना संघमालकांनी स्पॉन्सर केले होते.
गावातील तरुण सहकाऱ्यांनी या स्पर्धेला रोख स्वरूपात बक्षीस म्हणून रोख रक्कम दिली. खूप दिवसांनी गावामध्ये सर्व तरुणांनी एकत्र येत ही स्पर्धा यशस्वी केलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून गावातील लहान,तरुण वृद्ध एकत्र येऊन एकत्र हितगुज करताना दिसले .यातून गावचा एकोपा आणि गावचा उत्सव अधिक आनंददाई होण्यास मदत झाल्याची भावना शिरदाळे ग्रामस्थांनी व्यक्त केली
-
गावागावातुन3 months ago
भीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन3 months ago
भीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन5 months ago
पारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक3 weeks ago
देवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन5 months ago
जारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
महाराष्ट्र12 months ago
भीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
-
गावागावातुन6 months ago
भीमाशंकर कारखान्यास “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार” जाहीर
-
मनोरंजन12 months ago
शिवरायांचे मावळे आम्ही