नितीन मारुती मिंडे यांना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने ,अमेरिकेत होणाऱ्या मिलियन डॉलर राउंड टेबल( एम डी आर टी )या जागतिक विमा परिषदेमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा बहुमान प्राप्त झाल्याची माहिती नारायणगाव शाखेची शाखा अधिकारी सुधीर कांत यांनी दिली
, नितीन मिंडे हे ग्रामीण भागात विम्याचा प्रचार व प्रसार करण्यात अग्रेसर भूमिका बजावत आहेत ,त्यामुळे त्यांचे शाखा अधिकारी सुधीर कांत व सह शाखा अधिकारी आनंद ठाकूर व विकास अधिकारी रघुनाथ काकडे यांनी अभिनंदन ,करून त्यांचा शाल व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार ही करण्यात आला आहे..
त्यांच्या या कामाचे ग्रामीण भागात मोठे कौतुक होत आहे या कामात त्यांची पत्नी सौ सोनल मिंडे यांनी बहुमोल सहकार्य केले, असून त्यांचे मंचर येथे विमा हप्ता भरणा केंद्र असून तेथे नव्या जुन्या सर्व विमा व मेडिक्लेम पॉलिसीना सेवा देण्याचे काम सोनल मिंडे करत आहेत….
यावेळी शाखा अधिकारी श्री सुनील कांत श्री आनंद ठाकूर सह शाखा अधिकारी व एन बी विभागप्रमुख रामदास भोईर यांची भाषणे झाली व रघुनाथ काकडे विकास अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले

