जारकरवाडी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदी गणेश खुडे यांची निवड

Share

मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी ( ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सोसायटी व्हईस चेअरमन पदी गणेश शिवाजी खुडे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष सुभाष मारूती भोजने यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर खुडे यांची निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे चेअरमन सूर्यकांत लबडे, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा रूपाली भोजने, माजी चेअरमन खंडूशेठ भोजने, डि.डि भोजने, संतोष कापडी,संतोष विधाटे, बाळु शंकर लबडे, अशोक धानापुणे, बाबाजी देवडे, लक्ष्मण हरिभाऊ भोजने, एकनाथ भोजने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही वाघमारे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव नवनाथ मंचरे यांनी काम पाहिले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन गणेश खुडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या