सिल्लोड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न;अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती

Share

सिल्लोड प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शिवसेना नेते आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथे आयोजित रक्तदान शिबीर तसेच फेस ऑफ आंबेडकर राईट मोमेंट च्या वतीने आयोजित गरजू विद्यार्थ्यांना एक वही एक पेन या उपक्रमास आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट दिली.

  त्यासोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना नेते आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे देखील अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांचाहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या