जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन

Share

मुंबई प्रतिनिधी

जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांचे आज अल्पशा आजाराने नाशिक येथे खासगी रुग्णालयात निधन झाले.

शुक्रवारी (ता. 6) सकाळपासूनच पिचड यांची प्रकृती खालावली होती. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ब्रेन स्ट्रोक आल्याने दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची आजारपणातच प्राणज्योत मालवली

मधुकर पिचड यांचा जीवनपट

मधुकर काशिनाथ पिचड, माजी मंत्री

जन्मतारीख – ०१ जून १९४१

गाव – राजुर, अहिल्यानगर, वडील शिक्षक होते.

शिक्षण – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी ए एल एल बीचे शिक्षण. तिथूनच विद्यार्थी राजकारणाला सुरुवात

राजकीय प्रवास –

  • अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून १९७२ ला निवड
  • १९७२ ते १९८० पंचायत समितीवर सभापती म्हणून निवड
  • १९८० पासून २००९ पर्यन्त सलग ७ वेळेस आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले
  • १९९५ ते जुलै १९९९ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली होती.
  • राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही पिचड यांनी धुरा सांभाळली होती
  • मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा राहिलाय.
  • राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत होते, २०१४ ला अकोले मतदार संघात पुत्र वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून निवडून आणले
  • २०१९ ला पिचड यांनी आपल्या मुलासह भाजपात प्रवेश केला. त्यावेळी वैभव पिचड यांचा भाजपच्या तिकीटावर पराभव झाला.
  • मधुकर पिचड यांनी १९६१ मध्ये अमृत सागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली
  • मधुकर पिचड यांनी १९९३ मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला
  • आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडलीये

खासदार नीलेश लंके यांनी वाहीली श्रद्धांजली

Related Articles

ताज्या बातम्या