छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांमध्ये तीन खुनाच्या घटना समोर आल्या आहेत,हर्सूल परिसरात झालेल्या खुनामुळे खळबळ उडाली आहे.छत्रपती संभाजीनगर शहरात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे.,त्यानंतर मिसरवाडी भागात शुल्लक कारणावरून एकाची हत्या करण्यात आली आहे . 5 डिसेंबर रोजी देखील झाल्टा फाटा येथील एका हॉटेलमध्ये एका निष्पाप अभियंत्याचा खून झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत्या गुन्हेगारीने तसेच खुणांच्या घटनेने डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्तांची भेट घेत या संदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच येत्या सात दिवसांमध्ये जर अशा घटनांना आवर घातला नाही तर क्रांती चौक ते पोलीस आयुक्त पर्यंत भव्य मशाल यात्रा काढण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
