मुंबई प्रतिनिधी
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी व शिवाजी पार्क मैदानात मांडलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांच्या विक्रीला यंदा जोरदार प्रतिसाद मिळाला. , प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या पुस्तकांबरोरच भारतीय राज्यघटना आणि चळवळीतील अनुभवांच्या अन्य पुस्तकांची लोकांनी खरेदी केली झाली.
शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारापासून रस्त्यांच्या दुतर्फा पुस्तकविक्रीसाठी लहान-मोठे स्टॉल उभारण्यात आले होते. नाममात्र दरात या पुस्तकांची विक्री होत असल्याने बहुतांश नागरिकांनी पुस्तकखरेदीला पसंती दिली. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘माझी आत्मकथा’, ‘जातीभेद निर्मूलन’, ‘बुद्ध, कार्ल मार्क्स आणि धम्माचे भवितव्य’, ‘विद्यार्थ्यांनो जागृत व्हा’, ‘गुलामगीरी .आसुड आणि आनेक पुस्तके लोक खरेदी करत होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रे, भाषणे असलेल्या पुस्तकांनाही चांगली मागणी होती. रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, म. जोतिबा फुले यांचे जीवनकार्य, आत्मचरित्र अशा पुस्तकांनाही चांगला प्रतिसाद मिळत होता आसे पुस्तक विक्रीकर सांगत होते
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे, मूर्ती, गीतांची पुस्तके यांचे स्टॉल उभारण्यात आले होते. सोबतीला गौतम बुद्ध यांच्या विविध मुर्ती लाॅकेट .चेन यांचेही स्टाॅल होते …

