Connect with us

गावागावातुन

धामणीच्या खंडोबा मंदिरात “सदानंदाचा येळकोट”चंपाषष्ठीला दर्शनासाठी व पाच नामाच्या जागरणासाठी भाविकांची अलोट मांदीयाळी …..

Published

on

Share

मंचर (प्रतिनिधी)
:सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडारा खोबरे उधळून हजारो भाविकांनी धामणी ( तालुका आंबेगांव)येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.पुणे.नाशिक व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या येथील म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात शनिवारी (दिं.७) स्कंद षष्ठी मार्तंड भैरवोत्थापन चंपाषष्ठीच्या भल्या पहाटे चार वाजता श्री खंडोबाच्या भव्य मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक चंपाषष्ठी उत्सव मंडळाचे मच्छिंद्र वाघ आणि परंपरागत सेवेकरी तांबे व भगत यांंनी केल्यानंतर पहाटे साडेचार वाजता स्वयंभू सप्तशिवलिंगावर साधारण दोन फूट उंच व दिड फूट रुंद व्यासाची सर्वांगसुंदर पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात येऊन खंडोबाच्या मुखवट्याला आणि पूर्वमुखी श्री म्हाळसाकांत खंडोबा.म्हाळसाई बाणाई व उत्तरमुखी असलेल्या खंडोबाच्या मानलेल्या बहिणीच्या जोगेश्वरीच्या विशाल देखण्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात येऊन त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास सेवेकरी धोंडीबा भगत.दादाभाऊ भगत.सुभाष तांबे.प्रभाकर भगत.शांताराम भगत.राजेश भगत.राहूल भगत.नामदेव भगत.ज्ञानेश्वर जाधव.सिताराम जाधव.देवानंद जाधव.दिनेश जाधव.नामदेव पवार.सुरेश पवार या सेवेकरी मंडळीच्या व भाविकांच्या उपस्थितीत विधीवत पूजा व महाआरती करण्यात आली.

त्यानंतर या सेवेकर्‍यांनी गाभार्‍यात सप्तशिवलिंगावर “सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडार उधळला. देवस्थानांच्या तांबे.भगत सेवेकरी मंडळीनी आणलेल्या पुरणपोळी.साजूक तूप.दूध.व खसखशीची खीर. सार.भात कुरडई व पापडी या पंचपक्वानांचा आणि वांग्याचे भरित,रोडग्याचा नैवेद्य सप्तशिवलिंगाला अर्पण करण्यात आला त्यानंतर दर्शन घेण्यासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. पहाटे दर्शनासाठी महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती .भाविकांच्या गर्दीने मंदिरात व परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले.

यावेळी धामणी.लोणी.खडकवाडी गावडेवाडी महाळुंगेपडवळ तळेगांव ढमढेरे अवसरी खुर्द संविदणे येथील मानकरी व सेवेकरी ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवस्थानातील पारंपारिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने पुणे.मुंबई भोसरी.पिंपरी चिंचवड शहरातील व परिसरातील भाविक सकाळपासून दर्शनाला येत होते. मंदिर परिसरात भंडारा खोबरे व पेढे विक्रीची व फुलाची दुकाने दिसत होती खाद्यपदार्थाच्या व कटलरी विक्रेत्याची दुकाने थाटलेली दिसत होती.मंदिराच्या शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती मंदिराच्या आवारात भाविकांची पांचनामाची जागरणे सुरु होती वाघेमंडळी वीर मंडळी जागरणाचे घटापुढे खंडोबाचा पांचनामाचा गजर करताना दिसत होते.

पंचक्रोशीच्या गावांमधील भाविक सहकुटुंब देवघरातील टाकाचे देव ताम्हणात आणून खंडोबाचा भंडारा व खोबरे उधळून भक्तिभावाने सदानंदाचा येळकोट करुन तळीभंडार करत होती दुपारी बारा नंतर देवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या मंदिराच्या हाँलमध्ये सकाळी नऊ वाजता ह.भ.प.प्रणितीताई यादव आळंदीकर यांचे काल्याचे किर्तन झाले.या किर्तन सोहळ्याला लोणी खडकवाडी.जारकरवाडी.आळंदी येथील वारकरी मंडळीनी पखवाज वीणा व टाळमृदुंगाची साथ दिली. किर्तनाची व्यवस्था सुभाष तांबे.अविनाश बढेकर व सेवेकरी मंडळीनी केली. दुचाकी व चारचाकी वाहानाने येणार्‍याची संख्या मोठी दिसत होती.चंपाषष्ठीला पाच नामाची जागरणे पार पडल्यानंतर महिला भाविक आनंद व्यक्त करताना दिसत होते.

पूर्वापार भाविक भक्त कुलस्वामी खंडेरायाला त्यांच्या काही अडीअडचणी दूर करण्यासाठी नवस बोलले जायचे त्यानंतर ज्यांच्या अडीअडचणी दूर झाल्या त्या भाविक भक्तांनी नवसाची पूर्तता करण्यासाठी चंपाषष्ठीला पाच नामाची जागरणे घालण्याची परंपरा  सुरु झाली असल्याचे भगत.वाघे मंडळीकडून सांगण्यात आले त्यानंतर त्या विविध आडनावांच्या कुळांच्या वारसांनी ही परंपरा आजतागायत जतन करुन ठेवलेली आहे म्हणून धामणीचा खंडोबा हे जागृत देवस्थान मानले जाते  चंपाषष्ठीला पाचनामाची जागरणे करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केलेली होती.

वाघे व वीर मंडळीची प्रत्येक घटासमोर पाच नामाचा येळकोट करण्यासाठी धावपळ होत असताना दिसत होती.मंदिरात पाच नामाची जागरणे सुरु असताना खंजिरी.तुणतुणे. व टाळाचा तसेच कासवाजवळील इतिहासकालीन घंटेचा सुमधुर आवाज मंदिरात ऐकायला मिळत होता.दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठी उत्सव मंडळाच्या वतीने कवड्या गव्हाच्या भरड्याचा व सेंद्रीय गुळाचा.व गावठी तुपाचा वापर करुन तयार केलेल्या केशरमिश्रीत सुंगधी लापशीचे व वांग्याच्या रस्सा भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.दुपारी एक वाजेपर्यत चार हजाराहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला असल्याचे सांगण्यात आले भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था कुलस्वामी हाँल व मंदिरासमोरील फरशीच्या ओट्यावर करण्यात आलेली होती.महाप्रसादाची व वाढपाची उत्कृष्ठ व्यवस्था मच्छिंद्रनाथ वाघ.किसनराव रोडे.आण्णा पाटील जाधव.डाँ पाटीलबुवा जाधव.नामदेवराव जाधव.सुभाषराव काचोळे.सुभाषराव सोनवणे.प्रकाशनाना विष्णू जाधव.प्रकाशराव वरे.पंढरीनाथ खुडे.यांनी व ग्रामस्थांनी पाहिली

                                  निस्सीम सेवाभक्ती करणार्‍या तांबेबाबा भक्ताच्या प्रेमाखातर कुनाडीच्या डोंगरावरुन माघ शुध्द पौर्णिमेला पहाटेच्या सुमारास आता जे मंदिर उभे आहे त्या ठिकाणच्या काळ्या पाषाणाच्या कपारीतील निवडुंगाच्या बेटात खंडोबा वाघाच्या रूपात बसून दृष्ट्रान्त देऊन लुप्त झाल्यानंतर त्याठिकाणी सप्तशिवलिंगे आढळली ती सप्तशिवलिंग म्हणजे खंडोबाचा परिवार समजला जातो त्यामध्ये प्रामुख्याने म्हाळसाई बाणाई हेगडी प्रधानघोडा.कुत्रा.काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी हे असल्याचे मानले जाते त्यामुळे चंपाषष्ठीला.माघ पोंर्णिमा व चैत्र पौंणिमेला भाविक श्रध्देने आवर्जुन येतात असे सेवेकरी मंडळीनी सांगितले चंपाषष्ठी श्री म्हाळसाकांत खंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव.श्री मल्हारी मार्तंडाचे षड:रात्रोत्सोवाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासूर दैत्यांचा संहार केला.

व भूतलावरील अरिष्ट टाळले. या विजयोत्सोवामध्ये देवगणांनी मार्तंडभैरवावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याच्या फुलांची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशिर्ष शुध्द षष्ठीला “चंपाषष्ठी ” असे नाव मिळाले. खंडोबाच्या कुलधर्माचे वेळी भाविकाच्या घरातील देवघरात बसविलेल्या घटाला पुरणपोळीच्या नैवैद्याबरोबर ठोंबरा (जोंधळे शिजवून त्यामध्ये दही व मीठ घालून करण्यात येतो)कणकेचा रोडगा.वांग्याचे भरीत.पातीचा कांदा.व लसून याचाही नैवेद्य खंडोबाच्या घटाला दाखवण्यात येतो.त्यानंतर तळीभंडार विधी करण्यात येतो एका ताम्हणात विड्यांची पाच पाने. व त्यावर पाच नाणी व पाच सुपार्‍या ठेवतात त्याचप्रमाणे खोबर्‍याच्या वाट्या व भंडार ठेवून मग घरातील पाच.सात.अशा संख्येमध्ये घरातील मंडळी ताम्हण वर उचलून”सदानंदाचा येळकोट”भैरवनाथाचे चांगभले”व अंबाबाईचा उदेउदे” असा पुकारा करीत ते ताम्हण तीनवेळा उचलून झाल्यानंतर खाली ठेवतात व ताम्हणातील भंडार सर्वाना लावण्यात येतो व तो देवाचा भंडार घरात व घराच्या परिसरात श्रध्देने उधळण्यात येतो.सर्वाना पानसुपारी.दक्षिणा.खोबरे देऊन त्यानंतर दिवटीबुधली घेऊन खंडोबाची आरती करतात यालाच “तळीभरणे”असे म्हणतात असे यावेळी खंडोबाचे सेवेकरी भगत.वाघे मंडळीनी यावेळी सांगितले

जिर्णोध्दाराचा रौप्यमहोत्सव

धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन खंडोबा मंदिराचा जिर्णोध्दार शुभारंभ देवदिपावली (सन १९९९)ला ह.भ,प. प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते झालेला आहे.नुकतेच अंमळनेरकर पायी दिंडी आळंदीहून अंमळनेरकडे जाताना धामणीच्या खंडोबा मंदिरात देवदिपावलीला (२डिंसेबर२४)आलेली असताना “जयविजय” शिल्पाचे अनावरण कार्यक्रमात अमळनेरकर महाराजांनी खंडोबा देवस्थान मंदिराच्या जिर्णोध्दार संकल्पाला २५ वर्षे पूर्ण झाली त्याप्रित्यर्थ म्हाळसाकांत खंडोबा सर्वांगसुंदर मूर्तीजवळ चांदीचे खडग (तलवार) बसवण्याची व मंदिर परिसरात “भक्ति शक्तीचे” प्रतिक म्हणून जगतगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे भेटीचे एकत्रित संगमरवरी शिल्प बसवण्याची सूचना ग्रामस्थांना केलेली होती चंपाषष्ठी उत्सव सोहळ्यासाठी आलेल्या दोन भाविकांनी अनुक्रमे रुपये एक लाख व रुपये अडीच लाख किंमतीचे खंडोबा मूर्तीजवळ ठेवण्यासाठी चांदीचे खडग(तलवार) व भक्तीशक्ती संगमरवरी शिल्प देण्याचे व येणार्‍या माघ पोर्णिमेच्या यात्रेपूर्वी (दिं.१२ फेब्रुवारी २४)शिल्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे मान्य केले असल्याचे ग्रामस्थांनी व सेवेकर्‍यांनी सांगितले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

व्हर्लपूल ऑफ इंडिया लि च्या वरिष्ठ व्यस्थापक यांची केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई येथील जल संसाधन विकास उपक्रमांना सदिच्छा भेट

Published

on

Share

शिरूर / आंबेगाव: उपजीविका विकासासाठी जल संसाधन विकास ह्या प्रकल्पा अंतर्गत शिरूर तालुक्यात लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन व व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 07 गावा मध्ये तसेच इलीका पी बी व्हर्लपूल आप्लायन्सेस प्रा. लि अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील 06 गावा मध्ये सिमेंट नाला बंधारा, माती बंधारा दुरुस्ती व गाळ काढणे, सूक्ष्म व तुषार सिंचन व रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवणे असे उपक्रम राबविले जात आहेत

व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेडच्या वरिष्ठ व्यवस्थापक सुश्री श्वेता श्रीवास्तव व लुपीन फाउंडेशन चे वर्क साईड हेड श्री वेंकटेश सर यांनी शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील जल संसाधन विकास प्रकल्पातील केंदूर, लोणी व कान्हूर मेसाई या गावातील विविध उपक्रमांना भेट दिली. गावातील शेतकरी व ग्राम पंचायत सदस्य यांच्याशी संवाद साधून उपक्रमांच्या माध्यमातून होणाऱ्या व झालेल्या परिणामांना समजावून घेण्यात आले तसेच त्यांनी मार्गदर्शन केले.

सुश्री श्वेता यांनी समुदायाच्या मजबूत सहभागाबद्दल आणि लाभार्थ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात लुपिन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

सदर भेटी दरम्यान केंदूर च्या विद्यमान सरपंच सौ. मंगलताई पऱ्हाड, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, माजी सरपंच सूर्यकांत थिटे, भाऊसाहेब थिटे, लोणीचे माजी सरपंच उद्धव लंके, अशोक आदक, बाळशीराम वाळुंज तसेच शेतकरी उपस्थित होते.

सदर प्रकल्प भेटीचे नियोजन लुपिन फाउंडेशन चे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक संदीप झणझणे यांच्या मार्गदर्शनात शिरूर,आंबेगाव व जुन्नर चे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे व बाळासाहेब बोराडे यांनी केले.

Continue Reading

गावागावातुन

भीमाशंकरचा एफ.आर.पी.नुसार रु. ३,२७३/- प्रती मे.टन दर

Published

on

Share

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणा-या ऊसासाठी एफ.आर.पी. रक्कम रु. ३२७२.१४ येत असून त्यानुसार रु. ३२७३/- प्रती मे.टन दर देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दोन पंधरवड्याकरीता अदा केलेला प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे.टन वजा जाता उर्वरित रु. १७३/- प्रती मे.टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार शेतक-यांच्या बँक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मा. उच्च न्यायालय व शासनाचे निर्णयानुसार मागील हंगामाचा साखर उतारा गृहीत धरून मागील हंगामाचा ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा करावयाचा आहे. त्यानुसार गाळप हंगाम २०२५-२६ करीता देय एफ.आर.पी. रु.३२७२.१४ प्रती मे.टन येत आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या ऊसास प्रथम हप्ता रु. ३१००/- प्रती मे. टनाप्रमाणे अदा केलेला आहे. प्रथम हप्ता अदा करतेवेळी रक्कम उपलब्धतेनुसार एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार इथेनॉल विक्री, इथेनॉल व्याज परतावा व आयकर परताव्याची रक्कम जमा झाल्याने एफ.आर.पी.चे उर्वरित पेमेंटसाठी रक्कम उपलब्ध झाली आहे.


गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये दि. ३० नोव्हेंबर अखेर २ लाख १२ हजार ५८६ मे.टन ऊस गाळप झाले असून रु. १७३/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३ कोटी ६७ लाख ७७ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर बुधवार (दि. २४ डिसेंबर) रोजी वर्ग करणार असून यापुढे होणारे पंधरवडा ऊस पेमेंट रु. ३२७३/- प्रती मे.टन प्रमाणे वर्ग करण्यात येणार आहे. कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच वेळेमध्ये चांगला दर दिलेला आहे. तरी उस उत्पादक शेतक-यांनी आपला उत्पादित केलेला ऊस भीमाशंकर कारखान्यास गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले

Continue Reading

गावागावातुन

फेक नॅरेटीव्हला जनता थारा देत नाही,हे बिहारच्या निकालावरून सिद्ध – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published

on

Share

संगमनेर दि.१४ प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड केले असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बिहाराच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह सर्व मित्र पक्षांच्या नेत्याचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,बिहारच्या जनतेन खोट्या प्रचाराला बळी न विकास प्रक्रीयेला साथ दिली.अतिशय खालच्या स्तरावर जावून काॅग्रेस आणि मित्र पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला.प्रधानमंत्र्याच्या मातोश्रीबद्दल बोलले गेले हे अतिशय दुर्दैवी होते.

निवडणुकी पुर्वी व्होट चोरीच्या नावाखाली जाणीवपुर्वक दिशाभूल केली गेली.संविधानिक संस्थावर आरोप करण्यात आले.आपल्या राज्यातील जाणत्या राजांसह काही नेते त्यात सहभागी झाले.विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला बिहारची जनता कुठेही बळी पडली नसल्याचे विखे पाटील म्हणाले.

बिहारच्या निवडणुकीत काॅग्रेस पक्षाची झालेली वाताहात पाहाता राहूल गांधीनी आता पपरदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करण्यापेक्षा स्वताच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी काम करण्याचा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.

Continue Reading
Advertisement

Trending

Replica Watches Canada