मेंगडेवाडीत आधुनिक तंत्राने मल्चिंग पेपरवर कांदा लागवड

Share

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे शेतात बेडचा वापर करून मल्चिंग पेपरवर उन्हाळी कांदा लागवड केली आहे. मेंगडेवाडी ( ता. आंबेगाव जि पुणे) येथील युवक शेतकरी राहुल टाव्हरे यांनी घरच्या तीस गुंठे क्षेत्रावर प्रयोग केला आहे.
आंबेगावात सध्या उन्हाळ कांद्याची लागवडीची लगबग सुरू आहे. शेतकरी सतत शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी धडपडत असतात. पारंपरिक पद्धतीने पाठ पाण्यावरील लागवडीला फाटा देत मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाच्या आधारे कांद्याचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतो.

आंबेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत. शेतकरी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन या तंत्राआधारे कांद्याची आधुनिक शेती करू लागले आहेत. भारनियमन आणि बिबट्यापासून बचाव पाठ पाण्यावर कांदा उत्पादन घेताना थंडीत रात्री अप रात्री पिकाला पाणी द्यावे लागत होते,

बिबट्यांचे हल्ले आणि प्रसंगी शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावरील पद्धतीमुळे पाणी देण्याच्या वेळा वापर पद्धतीत बदल झाला कष्ट कमी झाले, बाहेर नियमन आणि बिबट्याची भीती कमी झाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव शेतकरी व्यक्त करत आहेत.

मल्चिंग पेपर वरील कांदा लागवडीचे फायदे.

* मल्चिंग पेपरवर एकसारख्या अंतरावरील चित्रामुळे दोन रूपांमध्ये नंतर एक सारखे राहते परिणामी कांद्याची वाढ चांगल्या प्रकारे होते प्रति कांद्याचे साधारण ग्राम पर्यंत मिळते.

* रंग आणि आकार एक सारखा राहिल्याने बाजारात चांगली दर मिळण्यास मदत होते.

* तणांची वाढनियंत्रणात ठेवण्यात येते. खुरपणी खर्च व तणनाशकांच्या फवारणीत बचत होते.

* टिकवण क्षमतेत चांगली वाढ. त्यामुळे बाजारपेठेच्या अंदाजानुसार विक्री नियोजनाला संधी मिळते.

* पारंपरिक पद्धतीमध्ये पाटपाण्यावर कांदा लागवडीसाठी वाफ्यांमध्ये पाणी साठवावे लागत असे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत होता. आता ठिबक व मल्चिंगमुळे पाण्याची बचत होणार आहे

Related Articles

ताज्या बातम्या