Connect with us

गावागावातुन

ऋषिकेश खालकर सीए परिक्षा उत्तीर्ण

Published

on

Share

मंचर

जवळे (ता.आंबेगाव ) येथील ऋषिकेश संजय खालकर याने आपल्या परिस्थितीवर मात करीत जिद्द व चिकाटी, मेहनतीच्या जोरावर सीएच्या (सनदी लेखापाल ) परिक्षेत यश मिळवले.पहिल्याच प्रयत्नात सीएची परिक्षा पास झाल्याबद्दल जवळे आणि निरगुडसर परिसरात त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.लहानपनापासून अभ्यासात हुशार असलेल्या ऋषिकेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद जवळे व पुढील शिक्षण पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय निरगुडसर येथे पूर्ण केले.

अकरावी, बारावी,बी.कॉम व एम.कॉमचे शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथे झाले.एम.कॉम करत असतानाच त्याने सीएचा अभ्यास केला.आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षी सीए होण्याचा मान मिळवून सीएला गवसणी घातली. व संपूर्ण देशात अवघड समजल्या जाणार्या सीएची परिक्षा उतीर्ण होऊन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला.ऋषिकेशचे वडील शेतकरी असून शेतीला मदत म्हणून गॅस वितरण व्यवसाय करत आहेत.

परस्थिती सर्वसाधारण असून सुद्धा मुलाला उच्च शिक्षण देण्याची त्यांची जिद्द होती आणि ती त्यांनी पूर्ण केली . यासाठी त्यांची पत्नी सुरेखा हिने सुद्धा मुलाला मोठे करण्यासाठी आपल्या पतीला मोलाची साथ दिली.    या यशाबद्दल ऋषिकेश म्हणाला कि पुण्याला बारामती हॉस्टेल येथे राहून बारा-बारा तास अभ्यास केला.अभ्यास करताना आईवडीलांचे कष्ट व घरची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केला.व आई वडील, भाऊ चुलते संतोष खालकर यांचे स्वप्न पूर्ण केल्याचा निश्चित मोठा आनंद आहे. ऋषिकेशला मिळालेल्या यशाबद्दल माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

गावागावातुन

वाल्मीक कराड सापडला पण… मयत सरपंच संतोष देशमुख यांना मृत्यूनंतर ही न्याय मिळेल का?

Published

on

Share

पुणे प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण आणि समाजकारण दोन्हीही ढवळून निघाले आहे. पंधरा दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्यापही देशमुख यांचे मारेकरी सापडले नाहीत. या मारेकरांचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला असताना आज वाल्मीक कराड सीआयडीकडे पुणे येथे हजर झाले आहेत

वाल्मीक कराड हेच मयत संतोष देशमुख यांचे मारेकरी आहेत का? जनता विचारते आहे? कारण आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षरीत्या वाल्मीक कराड यांच्यावरच आरोप केले आहेत. मात्र वाल्मीक कराड यांच्यावर पोलिस स्टेशनला फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

त्यामुळे संतोष देशमुख यांच्या खुनाशी संबंध नाही. असा बीडमधील एक मतप्रवाह आहे. तर दुसरा मतप्रवाह वाल्मीक कराड हेच या खुनाचे सूत्रधार आहेत .आणि त्यामुळेच ते पोलिसांपासून दूर पळत होते असा आहे .


आज वाल्मीक कराड यांनी पुणे शहरात सीआयडी कार्यालयात स्वतः आत्मसमर्पण केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील गृह विभाग वाल्मीक कराड यांची कसून चौकशी करून संतोष देशमुख यांचे यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार आहेत का याचा शोध घेतील आणि वाल्मीक कराड यांच्यावर दाखल असलेली खंडणीचा गुन्हा याबाबतही चौकशी करून पोलीस वाल्मीकरांवर योग्य ती कारवाई करतीलच अशी अपेक्षा बाळगू या..


वाल्मीक कराड याला सापडणं पोलिसांना का शक्य झालं नाही??
*सरकारमधील काही मंत्र्यांनी वाल्मीक कराडला जाणीवपूर्वक पोलिसांपासून दूर ठेवले का?

*मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब न्यायालयात गेल्याने वाल्मीक कराड पोलिसात हजर झाला आहेत का?
*आणि संतोष देशमुख यांना मृत्यूनंतर ही न्याय मिळेल का? यावर या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढील काळात आपणाला वाटच पहावी लागेल…

Continue Reading

गावागावातुन

शरद पवार अजित पवार एकत्र येतील.. ?राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपेंनी घेतली शरद पवारांची भेट.

Published

on

Share

पुणे:प्रतिनिधी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी आले होते. या भेटीनंतर चेतन तुपे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सगळ्या महाराष्ट्राची जी इच्छा आहे ते दोन्ही पवार करतील असे चेतन तुपे हे शरद पवार यांच्या भेटीनंतर बोलल्याने पुन्हा एकदा दोन्ही पवार एक होणार का ? ही चर्चा सुरू झाली आहे.

चेतन तुपे आज रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी शरद पवार यांना भेटण्यासाठी आले होते, त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर चेतन तुपे म्हणाले साहेब आमच्या सर्वांचेच आहेत, साहेब आमच्या घरातील व्यक्ती असल्यासारखे आहेत कायम राजकारण हा विषय नसतो साहेबांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला राजकारणाशी जोडू नये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील विठ्ठल तुपे असतील किंवा अजित दादांचे नेतृत्वाखाली मी असेच शिकलो आहे.

की राजकारण हा केवळ एक महिन्यापुरता विषय असतो एवढा एक महिन्यापूर्वी राजकारण करायचं असतं आणि त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकायचं असतं. त्यामुळे साहेबांची माझ्या वडिलांची आणि दादांची जी शिकवण आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्टीत आम्ही राजकारण पाहत नाही तर दोन राष्ट्रवादी एकत्र यावेत हा निर्णय मोठ्या पातळी वरचा आहे मी एक छोटा कार्यकर्ता आहे दोन्ही पवार नेहमी सांगतात एकमेकांना भेटतात वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा देतात त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे ती ते करतील असे देखील तुपे म्हणाले आहे.

Continue Reading

गावागावातुन

वाल्मीक कराडचं शेवटचं लोकेशन सी.आय.डी च्या हाती

Published

on

Share

बीड: प्रतिनिधी

राज्यात खळबळ उडवणाऱ्या बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता महत्त्वाचे अपडेट पुढे आले आहे या प्रकरणात हत्येचा आरोप असलेला वाल्मीक कराड पुण्यात असल्याची माहिती आहे. वाल्मीक कराडच्या शोधात सीआयडी कडे महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले आहेत. तांत्रिक विश्लेषणात वाल्मीक कराडचं शेवटचं लोकेशन सीआयडी च्या हाती लागल आहे .

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फरार होण्यापूर्वी वाल्मीक कराड पुण्यात वास्तव्यास होता 17 डिसेंबरला वाल्मीक कराड याचे शेवटचे ॲक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात दाखवल आहे. त्यानंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आहे. पुण्यात मोबाईल बंद करून तो फरार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीडच्या मस्साजोकचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.

दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून घेरण्यात आला आहे, तसेच वाल्मीक कराडचा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचा संबंध असल्यामुळे त्यांना ही लक्ष्य करण्यात येत आहे. वाल्मीक कराड हा परळी नगर परिषदेचा माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष माजी गटनेता आहे. तो मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी कराड सांभाळत असल्याचं सांगितलं जात आहे .

वाल्मीक कराड याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच वाल्मीक कराडचे अनेक नेत्यांबरोबरही फोटो आहेत ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरदचंद्र पवार यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे केज पोलीस ठाण्यात कराड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continue Reading
Advertisement

Trending