सोमवती अमावस्येनिमित्त धामणीत भाविकांनी केली गर्दी

Share

.

मंचर : प्रतिनिधी
पुणे.नगर.नाशिक मुंबई जिल्ह्यातील हजारो भाविकांचे कुलदैवत असणार्‍या धामणी ( तालुका आंबेगांव) येथे सोमवारी (३० डिसेंबर) सोमवती अमावस्येच्या निमित्ताने हजारो भाविकांनी गर्दी केलेली होती.

सकाळी ७ वाजता खंडोबा देवाच्या उत्सवमूर्तीच्या पालखी सोहळ्याने मंदिरातून देवमळ्यातील विहीरीवर शाहीस्नानासाठी प्रस्थान ठेवले. यावेळी भंडार खोबर्‍याच्या व फुलांच्या उधळणीत सदानंदाचा येळकोटचा जयघोष करण्यात आला.

पारंपारिक वाद्याच्या व फटाक्याच्या आतीषबाजीत सोमवती सोहळ्याला सलामी देण्यात आली. शाहीस्नानासाठी व पालखी सोहळ्यासाठी धामणी येथे पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती.


सोमवारी पहाटे मंदिरातील सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती झाल्यानंतर सकाळी वाघे व वीर मंडळीनी गावातून पालखी खंडोबा मंदिरात नेऊन मंदिरातील पंचधातूचा खंडोबा.म्हाळसाई व बाणाईचे सर्वांगसुंदर मुखवटे परंपरागत सेवेकरी भगत मंडळीकडून घेऊन ते वाजतगाजत देवमळ्यातील विहीरीवर आणले.

सोमवतीला येणार्‍या भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला

Related Articles

ताज्या बातम्या