वीणा सदगीर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

Share

मंचर प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कशिंबेग ( ता . आंबेगाव) येथील मुख्याध्यापिका विणा सदगीर यांना साने गुरुजी कथा माला प्रतिष्ठान तर्फे ‘साने गुरुजी शिक्षक रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४’ या गुणवंत शिक्षक पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचे हस्ते ( दि. २२ ) रोजी मंचर येथे सन्मानित करण्यात आले या प्रसंगी उपस्थित साने गुरुजी कथामालेचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते.


पुणे जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी भरीव योगदान असणाऱ्या, पूज्य साने गुरुजींचा वसा व वारसा जपणाऱ्या , कथामाले द्वारे संस्कारक्षम विद्यार्थी घडवत उत्तम नागरिकत्वाची जडण घडण करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो.


श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग या शाळेत कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापिका सदगीर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रेय पिंगळे व सर्व सहकारी शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या