जारकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुवर्णा भांड यांची बिनविरोध निवड

Share

मंचर प्रतिनिधी

जारकरवाडी (ता. आंबेगाव जि पुणे) येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुवर्णा एकनाथ भांड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या उपसरपंच कौसल्या भोजने यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. यावेळी एकमताने सुवर्णा भांड यांची निवड करण्यात आली.

उपसरपंच पदासाठी सुवर्णा एकनाथ भांड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रतीक्षा बढेकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन टाव्हरे, पुष्पा जारकड, सुरेश मंचरे, श्रावण काकडे, सुभाष लबडे, कौसल्या भोजने, रूपाली कजबे, अलका कापडी, शाम बढेकर आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सुवर्णा भांड यांची उपसरपंच पदी निवड झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कारला उत्तर देताना उपसरपंच सुवर्णा भांड म्हणाल्या की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन जारकरवाडी गावची विकास कामे केली जातील. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी ए.एस.अमराळे यांनी काम पाहिले.

Related Articles

ताज्या बातम्या