महा-इ-सेवा केंद्राकडुन लुट,भाजपा आक्रमक,केली कारवाईची मागणी

Share

.

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील व मंचर शहरातील काही ठराविक महा-ई-सेवा केंद्राकडून नागरिकांची मोठी आर्थिक लूट होत आहे ती त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणी भाजप नेते संजय थोरात यांनी तहसीलदार संजय नागटिळक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

आज दि.२ रोजी घोडेगाव तहसीलदार कार्यालयात तहसीलदार संजय नागटिळक यांची भेट भाजपनेते संजय थोरात यांनी घेतली


यावेळी त्यांनी आंबेगाव तालुका व मंचर शहरातील काही ठराविक महा-ई-सेवा केंद्राकडून नागरिकांची आर्थिक लूट होत आहे. ती बंद करावी अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.

निवेदनामध्ये त्यांनी आंबेगाव तालुका व मंचर शहरातील काही महा-ई-सेवा केंद्र अतिशय चांगले काम करत आहे. परंतु ठराविक महा-ई- सेवा केंद्र नागरिकांकडून अवाच्या सव्वा पैसे आकारत आहेत .

ऑनलाईन फॉर्म भरणे किंवा दाखले प्रमाणपत्रे काढून देण्यासाठी शंभर ते दोनशे रुपये घेणे आवश्यक असताना त्या ऐवजी एक हजार ते दोन हजार रुपये घेतले जात आहेत .तसेच त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे दर पत्रक लावलेले नाही. या महा- इ- सेवा केंद्रांना दर पत्रक त्वरित लावण्याच्या सुचना कराव्यात. व योग्य रक्कम आकारण्याच्या सुचना महा ई सेवा केंद्रांना करण्याच्या आणि कारवाई करण्याचे आश्वासनतहसिलदार संजय नागटिळक यांनी यावेळी दिले

तसेच सर्व महा ई सेवा केंद्रांना दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. तसे न करणार्यांची तक्रार तहसिलदार यांना संपर्क करून करावी लगेच कारवाई करण्याचेही आश्वासन तहसीलदार यांनी यावेळी दिले.

संजय थोरात यांच्यासोबत कालिदास गांजाळे,नवनाथ थोरात,सुनीत थोरात आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या