मंचर प्रतिनिधी
मेंगडेवाडी ( ता. आंबेगाव जिल्हा पुणे) येथील ऍडव्होकेट अशोक गोविंदराव गिरे ( वय ५९ ) यांचे हृदयविकराच्या धक्क्याने बुधवार ( दि. १ ) रोजी सायंकाळी मेंगडेवाडी येथे निधन झाले आहे. १९९० साली मेंगडेवाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी १९९२ ते १९९६ दरम्यान मेंगडेवाडीचे प्रथम सरपंच म्हणून चार वर्ष काम पाहिले होते .मेंगडेवाडीच्या विकास कामांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.
गेली तीस वर्षापासून पिंपरी चिंचवड व शिवाजीनगर येथे त्यांनी वकिली व्यवसाय केला. त्यांच्या पाश्चात पत्नी दोन मुले, चुलतभाऊ, पुतणे असा परिवार आहे .जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे, अनुसया उन्नती महिला केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर आदि जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
