Connect with us

महाराष्ट्र

विकास कामांमध्ये कमी पडणार नाही,खासदार नीलेश लंके यांची ग्वाही

Published

on

Share

पारनेर : प्रतिनिधी

    पाच वर्षे आमदार असताना आपण पारनेर-नगर मतदारसंघात सुमारे १ हजार  ८०० कोटी रूपयांची विकास कामे मार्गी लावली. यापुढील काळातही आपण विकास कामांमध्ये कमी पडणार नाही अशी ग्वाही खासदार नीलेश लंके यांनी दिली. 
      कोहकडी येथील १ कोटी २४ लाख ७३ हजार रूपये खर्चाच्या खंडेकर मळा येथील कोल्हापुर पध्दतीच्या बंधाऱ्यांचे खा. लंके यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले, त्यावेळी खा. लंके हे बोलत होते. 

      यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, कोहकडी हा परिसर बागायत भाग आहे. या भागाला कुकडी कालव्याचे नियमित पाणी मिळावे यासाठी आपण यापूवही पुढाकार घेतला. यापुढील काळातही या भागाला पाणी कमी पडणार नाही. जेथे शक्य असेल तिथे पाणी आडविण्यास आपण प्राधान्य देणार आहोत. कोहकडी येथील टोणगेवाडी येथेही बंधारा मंजुर करण्यात आला असून त्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येईल अशी ग्वाही लंके यांनी दिली. 

      यावेळी सुदाम पवार, खंडू भुकन, अर्जुन भालेकर, गंगाराम बेलकर, प्रा. संजय लाकुडझोडे, कारभारी पोटघन, सरपंच सिमा पवार, वसंत कवाद, ठकाराम लंके, अमृताशेठ रसाळ, किसनराव रासकर, रूपेश ढवण, डॉ. आबासाहेब खोडदे, जालिंदर झरेकर, राजेश शेळके, जालिंदर तानवडे, नितिन चिकणे, भाउसाहेब आढाव, प्रदीप सोमवंशी, कांतीलाल शेळके, अण्णा बढे, विलास मदगे, संभाजी मदगे, बापू मदगे, प्रविण उदमले, बाजीराव कारखिले, कैलास डोमे, दत्ता शेंडगे, लहानू टोणगे, रामदास चौधरी, मल्हारी धरणे, सर्जेराव चौधरी, गोरख टोणगे, वाल्मीक टोणगे, जयवंत गायकवाड, विशाल गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. 

पवार आमचे आधारस्तंभ- खासदार नीलेश लंके

माजी सभापती सुदाम पवार हे आपले आधारस्तंभ आहे. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे माग लावण्यात त्यांचे योगदान आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी येथे विकास कामांचे भुमिपुजन करण्यात येते. यंदाही विकास कामांचे भुमिपुजन करून ही परंपरा कायम ठेवण्यात आली.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

देशविदेश

केंद्रीय मंत्री अमित शहा यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट!शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुरू करण्याची केली विनंती

Published

on

Share

लोणी दि.९ प्रतिनिधी

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकार मध्ये मंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर विखे पाटील यांची पहीलीच भेट होती.शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा तातडीने सुरू करण्याची तसेच नदीजोड प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे. डॉ सुजय विखे पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

मागील अडीच वर्षात महायुती सरकारने सामान्य नागरीकांसाठी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांना जनतेचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे सांगतानाच महसूल व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय व कार्यान्वित झालेल्या योजनांची माहीती मंत्री विखे पाटील यांनी भेटीत झालेल्या चर्चे दरम्यान दिली.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश आणि अहील्यानगर मधील दहा विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर
मंत्री अमित शहा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली.या भेटी दरम्यान डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते.

महायुती सरकार मध्ये पुन्हा मंत्री पदाची संधी दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री
अमित शहा यांचे आभार मानले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.

शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याबाबत केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देवून आजच केंद्रीय सुरक्षा दलाचे मनुष्यबळ उपलब्ध करून देवून पुढील काही दिवसांत नाइट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याची ग्वाही मंत्री अमित शहा यांनी दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Continue Reading

महाराष्ट्र

पारगाव पोलीस स्टेशन कडून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलिस दल स्थापनादिनाचे औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या वतीने २ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलिस वर्धापन सप्ताहाचे तसेच ‘रेजिंग डे’चे अनुषंगाने पंडित जवाहरलाल विद्यालय निरगुडसर, आदर्श विद्यालय जारकरवाडी, संगमेश्वर विद्यालय पारगाव, शिवाजी विद्यालय धामणी या विद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबर, क्राईम, वाहतूक नियमन, महिला व बालकावरील अत्याचार, पोलीस खात्याची कार्यप्रणाली, डायल ११२ चे महत्व श्वनाचे कार्य याबाबत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती देण्यात आली . अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली.

या वेळी पोलिस सब इन्स्पेक्टर भाऊसाहेब लोकरे, पोलीस स्टेशनचा स्टाफ, डॉग स्कॉड (राधा आणि दुर्गा शाँन व हँन्डलर), बँन्ड पथक यांच्यासह. शालेय विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Continue Reading

महाराष्ट्र

मंचर नगरपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकवा भाजपा नेते गणेश भेगडे यांचे आवाहन

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

दि.५ रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मंचर शहरातील भाजप नेते संजय थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी भाजपाचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करुन मंचर नगरपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत संपूर्ण देशामध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियाना अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरांमध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले की,भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय विचारधारा जपणारा पक्ष आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घ्या तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मंचर शहराचा आढावा घेण्यात आला. मंचर शहरांमध्ये संजय थोरात यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना या लोकांपर्यंत नि:शुल्क (मोफत) पोहोचवल्या जातात .पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सर्वात चांगले काम या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून चालू आहे .

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्याला फडकवयाचा आहे. त्या अनुषंगाने कामाला लागा लोकसभा,विधानसभेला आपण युतीधर्म पाळला आता येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी आपली ताकद आहे. त्या ठिकाणी शंभर टक्के आपण आपले उमेदवार उभे करणार आहोत.

महायुतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल परंतु मंचर नगरपंचायतवर व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे. हे डोळ्यासमोर ठेवून आपण काम करा संजय थोरात यांचे अतिशय सुंदर काम चालू आहे. पक्ष नक्कीच जो काम करतो त्याला योग्य संधी देत असतो योग्य वेळी योग्य न्याय आपल्याला नक्कीच मिळेल काही काळजी करू नका कामाला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी भाजपा नेते संजय थोरात,सुरेश अभंग,नवनाथ थोरात,कालिदास गांजाळे,माऊली बाणखेले,अतिश काजळे,धनेश थोरात,अनिल अरगडे,महेश गांजाळे,स्नेहल चासकर,रुपाली घोलप,रुपाली दैने व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Continue Reading
Advertisement

Trending