मंचर प्रतिनिधी
लोणी ( ता . आंबेगाव जिल्हा पुणे) येथे महिला बचत गटांचे सशक्तीकरण करण्यासाठी सावित्रीबाई ग्रामसंघाच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी भाग भांडवल म्हणून बारा स्वयंसाहाय्यता महिला बचत गटानां नऊ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती आंबेगावच्या स्वयंसाहाय्यता विभाग प्रमुख अभियंता त्रंबक पारासूर. रमेश वकील सावित्री ग्रामसंघ लोणीच्या अध्यक्षा सुनिता कदम व लोणी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक टेमकर, शिरदाळे सरपंच मनोज तांबे, प्रकाश सिनलकर भाजपा दिव्यांग आघाडी आंबेगाव अध्यक्ष प्रकाश सिनलकर आदी मान्यवर उपस्थित होते
पारासुर यांनी उपस्थित बचत गटातील सर्व महिलांना वेगवेगळ्या योजना विषयी माहिती दिली. पारासुर म्हटले की वितरीत केलेले कर्ज हे शासनाचे भाग भांडवल हे आपण छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी त्याचा वापर करावा.
व त्यातून आपली व बचत गटाची उन्नती मोठ्या प्रमाणात होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे असे पारासुर यांनी सांगितले.
