जारकरवाडीच्या वैदवाडी चौकात अपघातांची मालिका सुरूच. गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

Share

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव कारखाना लोणी रस्त्यावर वैदवाडी चौकात अपघाताची मालिका कायमच सुरू आहे. चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची गती वाढली आहे. परिणामी रस्त्यालगतच्या दुकानदारांसह पादचाऱ्यांनी अपघाताची भिती व्यक्त केली आहे. वैदवाडी चौकात तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी जारकरवाडी सोसायटीचे चेअरमन सुर्यकांत लबडे व युवासेना उपतालुकाप्रमुख आंबेगाव विशाल कापडी यांनी केली आहे.

शुक्रवार (दि.०४) रोजी दुपारी बारा एक वाजण्याच्या सुमारास शिरूर वरून वैदवाडी फाटा मार्गे मंचर वरून भीमाशंकरला जाणारी चारचाकीच्या चालकाने पारगाव वैदवाडी फाटा मार्गे लोणीला जाणार्या दुचाकीला चारचाकीने चौकात जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा पाय फॅक्चर झाला आहे .

तर दुसरा व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे.त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. जखमीची नावे व गाडीचा क्रमांक व चारचाकी चालकांची नावे मिळू शकली नाहीत.

पारगाव कारखाना लोणी रस्त्यावर वैदवाडी चौकात नेहमीच अपघात घडताना दिसून येत आहेत. सदर चौक व परिसर नेहमीच वर्दळीचा आहे. या चौकात मंचर शिरूर व पारगाव कारखाना, लोणी या चारही गावाकडून येणारे रस्ते जोडले जातात. त्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असते.


त्यात आता चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यांची कामे झाली आहेत. काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. रस्ते चांगले झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. काही क्षणातच हा चौक वाहनचालक पार करत आहेत. रस्त्याचे काम नुकतेच झाले आहेत. यादरम्यान काही दुचाकीस्वारांचे किरकोळ स्वरुपाचे अपघात झाले आहेत. यापूर्वीही या रस्त्यावरून अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून काही नागरिकांना प्राणही गमावले लागले आहेत.

या चारही बाजूंनी रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व दवाखान्यात उपचारासाठी जाणाऱ्या वृद्धांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

त्यामुळे सार्वजानिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर गतिरोधक बसवणे गरजेचे आहे.

@वैदवाडी चौकात आबालवृद्धांची रस्ता ओलांडताना तारांबळ उडते. दुसरा कोणताही अनुचित प्रकार घडण्याची वाट न पाहता, या चौकात महत्त्वाच्या ठिकाणी प्रशासनाने गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.

  • सुर्यकांत लबडे
  • चेअरमन विकास सोसायटी जारकरवाडी.

Related Articles

ताज्या बातम्या