पर्यटन
शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा सोहळा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
शिर्डी (प्रतिनिधी):
ग्रीन एन क्लिन शिर्डी फाऊंडेशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या १३ फेब्रुवारीपासून शिर्डी महापरिक्रमा २०२५ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर आज शिर्डी महापरिक्रमेचा उद्घोषणा सोहळा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह परिसरातील असंख्य नागरिक व भाविकांनी उपस्थिती दर्शविली.
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते महापरिक्रमेची विधिवत उद्घोषणा करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी महापरिक्रमेच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमादरम्यान भजनांच्या सुरेल तालावर तयार झालेल्या आनंदमय वातावरणात मान्यवर आणि ग्रामस्थांसमवेत सहभाग घेत पाहुली या पारंपरिक नृत्याचा आनंद घेतला व सोहळ्याची रंगत वाढविली.

शिर्डी महापरिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे गव्हाच्या पिकांची पाहणी आणि चित्रीकरण करणे. त्यामुळे सोहळ्यास उपस्थित सर्वांनी शिर्डी परिक्रमेच्या निमित्ताने शेतांमधील गव्हाच्या पिकांची पाहणी केली. तसेच परिक्रमेदरम्यानच्या दृश्यांचे चित्रीकरण देखील करण्यात आले. त्याद्वारे या अनोख्या परंपरेचा अनुभव सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे.
या सोहळ्याला श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिरीष वमने (उपविभागीय पोलीस अधिकारी), महंत काशिकानंदजी सरस्वती महाराज, ग्रीन एन क्लीन शिर्डीचे अजित पारख, तसेच अभयभैय्या शेळके, गोपीनाथ बापू गोंदकर, विजयराव जगताप, दिगंबर कोते, ॲड. अनिल शेजवळ, गणेश कोते, डॉ. जितेंद्र शेळके, नितिन शेळके, प्रताप जगताप यांसारख्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
यावेळी डॉ. सुजय विखे यांनी शिर्डी महापरिक्रमा हा उपक्रम केवळ धार्मिक सोहळा नसून, तो सामाजिक एकात्मता आणि निसर्गप्रेमाचा संदेश देणारा सोहळा आहे, असे स्पष्ट केले. तसेच सर्व उपस्थितांनी शिर्डी महापरिक्रमेला भविष्यात अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या संकल्पाने सदरील कार्यक्रमाची सांगता केली.

गावागावातुन
मंचर बस स्थानकांमध्ये खड्डेच खड्डे, प्रवाशांचे हाल
मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील मंचर बस स्थानकांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
मॉन्सूनपूर्व पावसाचे आंबेगाव तालुक्यात जोरदार आगमन झाल्याने . या पावसाने मंचर बसस्थानक आणि परिसरात चिखल आणि जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामधून मार्गक्रमण करणे प्रवाशांसाठी जिकिरीचे झाले आहे.यामध्ये एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

बसस्थानकाच्या परिसरातील कामे करताना गटारे बुजली गेल्याने पाण्याचा निचरा न होता चिखल व खड्डे तयार होत आहेत .यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केली आहे. दहा-बारा दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे.हे पाणी प्रवाशांच्या कपड्यांवर उडत आहे.त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आंबेगाव
आंबेगाव तालुक्यातील मंचर हे तालुक्याचे केंद्रबिंदू असून तसेच या बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. शालेय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी परिसरातील गावातील शेकडो विद्यार्थी येथील बस स्थानकात दररोज येत असतात.
पावसाळ्याच्या दिवसात बसस्थानकातील या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खड्ड्यातून वाट शोधावी लागते आहे . बस स्थानकात प्रवेश करताना अनेक बसचालकांना खड्डा वाचविताना कसरत करावी लागते आहे. परिवहन विभागाने याबाबत लक्ष घालून बस स्थानकातील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी व तालुक्यातील नागरिकांनी केली आहे

गावागावातुन
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची देवदत्त निकम यांनी केली पहाणी
मंचर, प्रतिनिधी २७ मे २०२५ – आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २६ मे रोजी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी आणि पोंदेवाडी या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

या परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी २७ मे रोजी सकाळी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर आणि खडकवाडी या गावांचा दौरा केला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकम यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली.

अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे, फळबागांचे आणि तरकारी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
या पाहणी दौऱ्यात लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, दीपक वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनाथ वाळुंज, पंढरीनाथ गोपाळे, अर्जुन वाळुंज आणि राजेश वाळुंज उपस्थित होते.

या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
गावागावातुन
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची देवदत्त निकम यांनी केली पहाणी
मंचर, २७ मे २०२५ – आंबेगाव तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती, रस्ते आणि वीजपुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. २६ मे रोजी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर, खडकवाडी आणि पोंदेवाडी या गावांमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या परिस्थितीची माहिती मिळताच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी २७ मे रोजी सकाळी वडगावपीर, लोणी, वाळुंजनगर आणि खडकवाडी या गावांचा दौरा केला. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. निकम यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची विनंती केली.

अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे, फळबागांचे आणि तरकारी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

या पाहणी दौऱ्यात लोणीचे माजी सरपंच दिलीप वाळुंज, दीपक वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनाथ वाळुंज, पंढरीनाथ गोपाळे, अर्जुन वाळुंज आणि राजेश वाळुंज उपस्थित होते.
या आपत्तीमुळे तालुक्यातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकर मार्फत सभासद, ऊस उत्पादकांना गावोगावी साखर वाटप
-
गावागावातुन1 year agoभीमाशंकरकडून रु. २५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम बँकेत जमा
-
गावागावातुन2 years agoपारगाव कारखाना पोलीसांची दमदार कामगीरी.चोरीला गेलेल्या कांदा पिशव्यांचा तपास. चार आरोपी ताब्यात.
-
सामाजिक1 year agoदेवदत्त निकम यांनी कार्यकर्त्यांला चप्पल विकत घेऊन दिली.. तर दुसऱ्याला घेऊन गेले सलुनमध्ये
-
गावागावातुन2 years agoजारकरवाडी येथे कांद्याची चोरी
-
सामाजिक11 months agoशेतकऱ्यांला मारहाण केल्याप्रकरणी उद्योजक, संविदणे गावचे माजी सरपंच वसंत पडवळ यांच्यासह दोघांना अटक
-
मनोरंजन2 years agoशिवरायांचे मावळे आम्ही
-
महाराष्ट्र2 years agoभीमाशंकरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार व तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान
