Connect with us

महाराष्ट्र

धामणीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी..

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

धामणी (ता. आंबेगाव) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४वी जयंती व ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेचा ६ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त १९ते २१ डिसेंबर रोजी तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील ५२ शाळांमधील १५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .आज जयंती सोहळ्या निमित्त स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

वकृत्व स्पर्धा निकाल २०२४

गट क्र . १ – १ली ते ४थी
१) स्वराली संदीप आळेकर (प्रथम)
२) राजवीर ज्ञानेश्वर वाळुंज ( प्रथम )
३ ) ध्रुव साईदिप ढोबळे (द्वितीय )
४ ) ओवी ज्ञानेश्वर वाव्हळ ( द्वितीय ) ५) ईश्वरी संदीप सिनलकर (तृतीय) ६) रूद्र संदीप वाळुंज (तृतीय) ७) दिव्या वाघ (उत्तेजनार्थ)

गट क्र 2 5 वी ते ७ वी

१ ) गांधी प्रणाली राहुल (प्रथम )
२ ) अर्श अक्षय काळे (प्रथम )
३ ) लंघे ईश्वरी वैभव (द्वितीय )
४ ) विर आराध्या राजेंद्र (द्वितीय ) ५) टाव्हरे सायली भगवान (तृतीय) ६) आचार्य शौर्या शैलेश (तृतीय) ७) खिलारी दिव्या विकास (उत्तेजनार्थ)
गट क्र . 3 ८ वी ते १० वी
१) इगवले सानिका अमोल (प्रथम )
२) वाघ पायल गोरक्षनाथ (प्रथम )
३ ) रोडे महिमा सचिन (द्वितीय )
४ ) भांड सार्थक विजय (द्वितीय)
५ ) गव्हाणे तन्वी रोहिदास (तृतीय) ६) मुलाणी जकिया चांदभाई (तृतीय) ७) मोमीन सोहा मोहंमदहनिफ (उत्तेनाजार्थ)


गट क्र . ४ ११ वी ते १२ वी
१ ) कासार वैभवी रोहिदास (प्रथम )
२ ) दरेकर गौरी ज्ञानेश्वर (प्रथम )
३ ) जाधव संस्कृती योगेश (द्वितीय )
४ ) थोरात सानिका संदीप (द्वितीय )
५ ) भंडारी श्र्वेता रवींद्र (तृतीय) ६) वायकर साहिल श्रीकांत (तृतीय) ७) तांबे वैष्णवी कैलास (उत्तेणाजार्थ)

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांनी सावित्री बाई फुले यांचा जीवनपट उलगडला.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी (पश्चिम विभाग) डी. आर. गायकवाड,डायनॅमिक भोसरी रोटरी क्लबचे माजी अधक्ष ज्ञानेश्र्वर विधाटे,सरपंच रेश्मा बोऱ्हाडे ,

शांताराम जाधव,बबन भूमकर ,भिमाशंकर शिक्षणं संस्थेचे सचिव वसंत जाधव, माजी सरपंच सागर जाधव ,पोलिस पाटील सुरज जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम , जि.प शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले , शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य पोपट शेंडकर, अंकुश भुमकर, निवेदक मयुर सरडे व ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अक्षय विधाटे यांनी केले.

Continue Reading
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

देशविदेश

केंद्रीय मंत्री अमित शहा यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट!शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुरू करण्याची केली विनंती

Published

on

Share

लोणी दि.९ प्रतिनिधी

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकार मध्ये मंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर विखे पाटील यांची पहीलीच भेट होती.शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा तातडीने सुरू करण्याची तसेच नदीजोड प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे. डॉ सुजय विखे पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

मागील अडीच वर्षात महायुती सरकारने सामान्य नागरीकांसाठी यशस्वीपणे राबवलेल्या योजनांना जनतेचे मोठे पाठबळ मिळाले असल्याचे सांगतानाच महसूल व दुग्ध व्यवसाय विकास विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णय व कार्यान्वित झालेल्या योजनांची माहीती मंत्री विखे पाटील यांनी भेटीत झालेल्या चर्चे दरम्यान दिली.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश आणि अहील्यानगर मधील दहा विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर
मंत्री अमित शहा आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली.या भेटी दरम्यान डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित होते.

महायुती सरकार मध्ये पुन्हा मंत्री पदाची संधी दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री
अमित शहा यांचे आभार मानले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आशा नदीजोड प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्याची विनंती मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.

शिर्डी विमानतळावरून नाईट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याबाबत केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देवून आजच केंद्रीय सुरक्षा दलाचे मनुष्यबळ उपलब्ध करून देवून पुढील काही दिवसांत नाइट लॅण्डीग सुविधा सुरू करण्याची ग्वाही मंत्री अमित शहा यांनी दिली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Continue Reading

महाराष्ट्र

पारगाव पोलीस स्टेशन कडून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

महाराष्ट्र पोलिस दल स्थापनादिनाचे औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या वतीने २ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलिस वर्धापन सप्ताहाचे तसेच ‘रेजिंग डे’चे अनुषंगाने पंडित जवाहरलाल विद्यालय निरगुडसर, आदर्श विद्यालय जारकरवाडी, संगमेश्वर विद्यालय पारगाव, शिवाजी विद्यालय धामणी या विद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबर, क्राईम, वाहतूक नियमन, महिला व बालकावरील अत्याचार, पोलीस खात्याची कार्यप्रणाली, डायल ११२ चे महत्व श्वनाचे कार्य याबाबत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती देण्यात आली . अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली.

या वेळी पोलिस सब इन्स्पेक्टर भाऊसाहेब लोकरे, पोलीस स्टेशनचा स्टाफ, डॉग स्कॉड (राधा आणि दुर्गा शाँन व हँन्डलर), बँन्ड पथक यांच्यासह. शालेय विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Continue Reading

महाराष्ट्र

मंचर नगरपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकवा भाजपा नेते गणेश भेगडे यांचे आवाहन

Published

on

Share

मंचर प्रतिनिधी

दि.५ रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मंचर शहरातील भाजप नेते संजय थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी भाजपाचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करुन मंचर नगरपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत संपूर्ण देशामध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियाना अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरांमध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले की,भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय विचारधारा जपणारा पक्ष आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घ्या तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मंचर शहराचा आढावा घेण्यात आला. मंचर शहरांमध्ये संजय थोरात यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना या लोकांपर्यंत नि:शुल्क (मोफत) पोहोचवल्या जातात .पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सर्वात चांगले काम या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून चालू आहे .

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्याला फडकवयाचा आहे. त्या अनुषंगाने कामाला लागा लोकसभा,विधानसभेला आपण युतीधर्म पाळला आता येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी आपली ताकद आहे. त्या ठिकाणी शंभर टक्के आपण आपले उमेदवार उभे करणार आहोत.

महायुतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल परंतु मंचर नगरपंचायतवर व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे. हे डोळ्यासमोर ठेवून आपण काम करा संजय थोरात यांचे अतिशय सुंदर काम चालू आहे. पक्ष नक्कीच जो काम करतो त्याला योग्य संधी देत असतो योग्य वेळी योग्य न्याय आपल्याला नक्कीच मिळेल काही काळजी करू नका कामाला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी भाजपा नेते संजय थोरात,सुरेश अभंग,नवनाथ थोरात,कालिदास गांजाळे,माऊली बाणखेले,अतिश काजळे,धनेश थोरात,अनिल अरगडे,महेश गांजाळे,स्नेहल चासकर,रुपाली घोलप,रुपाली दैने व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Continue Reading
Advertisement

Trending