मंचर प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलिस दल स्थापनादिनाचे औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस स्टेशनच्या वतीने २ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलिस वर्धापन सप्ताहाचे तसेच ‘रेजिंग डे’चे अनुषंगाने पंडित जवाहरलाल विद्यालय निरगुडसर, आदर्श विद्यालय जारकरवाडी, संगमेश्वर विद्यालय पारगाव, शिवाजी विद्यालय धामणी या विद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सायबर, क्राईम, वाहतूक नियमन, महिला व बालकावरील अत्याचार, पोलीस खात्याची कार्यप्रणाली, डायल ११२ चे महत्व श्वनाचे कार्य याबाबत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती देण्यात आली . अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली.
या वेळी पोलिस सब इन्स्पेक्टर भाऊसाहेब लोकरे, पोलीस स्टेशनचा स्टाफ, डॉग स्कॉड (राधा आणि दुर्गा शाँन व हँन्डलर), बँन्ड पथक यांच्यासह. शालेय विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

