मंचर प्रतिनिधी
दि.५ रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मंचर शहरातील भाजप नेते संजय थोरात यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी भाजपाचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करुन मंचर नगरपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत संपूर्ण देशामध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियाना अंतर्गत आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरांमध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले की,भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय विचारधारा जपणारा पक्ष आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घ्या तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मंचर शहराचा आढावा घेण्यात आला. मंचर शहरांमध्ये संजय थोरात यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना या लोकांपर्यंत नि:शुल्क (मोफत) पोहोचवल्या जातात .पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सर्वात चांगले काम या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून चालू आहे .
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्याला फडकवयाचा आहे. त्या अनुषंगाने कामाला लागा लोकसभा,विधानसभेला आपण युतीधर्म पाळला आता येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी आपली ताकद आहे. त्या ठिकाणी शंभर टक्के आपण आपले उमेदवार उभे करणार आहोत.
महायुतीचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल परंतु मंचर नगरपंचायतवर व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे. हे डोळ्यासमोर ठेवून आपण काम करा संजय थोरात यांचे अतिशय सुंदर काम चालू आहे. पक्ष नक्कीच जो काम करतो त्याला योग्य संधी देत असतो योग्य वेळी योग्य न्याय आपल्याला नक्कीच मिळेल काही काळजी करू नका कामाला लागा अशा सूचना कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी भाजपा नेते संजय थोरात,सुरेश अभंग,नवनाथ थोरात,कालिदास गांजाळे,माऊली बाणखेले,अतिश काजळे,धनेश थोरात,अनिल अरगडे,महेश गांजाळे,स्नेहल चासकर,रुपाली घोलप,रुपाली दैने व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
