मंचर प्रतिनिधी
मंचर शहरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त एस कॉर्नर परिसरातील महिलांसाठी चासकर परिवाराच्या वतीने “हळदी कुंकू समारंभ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प सुरेखा शिंदे यांनी भारतीय हिंदू धर्म संस्कार, संस्कृती या विषयावर प्रवचन केले.
या कार्यक्रमाला एस कॉर्नर व मंचर शहरातील ३५० हुन अधिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .या सर्व महिलांना सुंदर वसंत चासकर व स्नेहल वसंतराव चासकर यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप नेते संजय थोरात म्हणाले की,आपण सर्वांनी स्त्री शक्तीचा आदर व सन्मान केला पाहिजे तसेच राजमाता जिजाऊ मा साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या पद्धतीने राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजामध्ये काम केलं पाहिजे आज देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहे.
महिलाही कोणत्याही गोष्टींमध्ये कमी नाही.सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे येणाऱ्या काळामध्ये मंचर शहरातील महिलांसाठी छोटे मोठे उद्योग आमच्या माध्यमातून उभारण्याचा आमचा मानस आहे. तसेच तरुण मुलींसाठी कराटे प्रशिक्षण वर्ग,लाठी-काठी आपल्या भागामध्ये सनातन संस्था व शिवशक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केले जाते यामध्ये आपण आपल्या मुलींना प्रशिक्षण वर्गाला पाठवा. यामुळे स्वतःचं रक्षण त्यांना करता येईल तसेच सर्व माता-भगिनींना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या..
यावेळी नंदकिशोर गांजाळे, सावळेराम गांजाळे,परसराम गांजाळे,मा.सरपंच प्रमिला निराळे,अर्चना बुट्टे,प्रियांका थोरात,रूपाली तूळे,हिरा मांडगे, दिपाली सुतार,रिंकू कश्यप, कोमल गवारी,शितल सोनवणे तसेच मोठ्या संख्येने एस कॉर्नर,गांजाळेमळा,बेंडेमळा, लोंढेमळा,माशेरेमळा येथील माता-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना संदीप वाबळे यांनी केली, सूत्रसंचालन मिथुन पांचाळ यांनी केले व आभार श्रीराम गांजाळे यांनी मानले…
