मंचर प्रतिनिधी
धामणी (ता आंबेगाव )येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला ज्ञानेश्वर सासवडे (वय – ८० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . धामणीच्या सामाजिक,शैक्षणिक ,धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता.
त्यांच्यामागे मुलगा मुलगी, दोन सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून वृत्तपत्र विक्रेते ( स्व ) विनायक सासवडे व निवृत्त पोस्ट कर्मचारी सुनील सासवडे यांच्या त्या आई तर अभियंता योगेश ,,गणेश महेश व प्रज्ञेश सासवडे यांच्या त्या आजी होत
