मंचर शहरात कॅफेमध्ये अश्लील चाळे पोलिसांची कारवाई

Share

मंचर प्रतिनिधी

मंचर (ता. आंबेगाव जि पुणे)येथे मोठ्या प्रमाणात कॅफे सुरू झाले आहेत. बहुतेक कॅफेंमध्ये अश्लील चाळे करण्यासाठी छोटे छोटे कंपार्टमेंट पडदे लावण्यात आले आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी या कॅफेमध्ये बसून आपला वेळ वाया घालवत आहेत. त्यांचा त्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. अशा तक्रारी मंचर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार मंचर पोलीसांनी आज मंचर शहरातील पाच कॅफेवर धाड टाकली. त्यामध्ये अनेक कॅफेंमध्ये आक्षेपार्ह केबीन्स पडदे लावल्याचे निदर्शनास आले आहे.आक्षेपार्ह असणाऱ्या कॅफेवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

सावधान मंचरमध्ये कॅफे बनले अश्लील चाळे करण्याचे ठिकाण

आपला मुलगा मुलगी कॅफे मध्ये जात असेल तर एकदा खात्री करुन घ्या. आपला मुलगा मुलगी या पडदे लावलेल्या, कॅफे मध्ये जाऊन वेळ वाया तर घालवत नाही ना? यांची खात्री करा.. अन्यथा तुमच्या मुलाला, मुलीला पोलिस स्टेशनची हवा खावी लागेल.. अश्लील चाळे करण्याच्या उद्देशाने बनवलेल्या कॅफेमध्ये पोलिस भरती करणारे, स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थीही वेळ वाया घालवत असल्याची चर्चा आहे. मंचर पोलिसांनी आज मुले व मुली एकत्रित बसलेल्या कॅफे मालकांवर कारवाई केली.तर मुला मुलींना पोलिसी खाक्या दाखवला आहे.

मंचर पोलिस स्टेशनने कॅफेवर केलेल्या कारवाईचे नागरिकाकडुन स्वागत होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या