तमाशा कलावंतांचा पोंदेवाडी ग्रामस्थांकडून सत्कार

Share

मंचर प्रतिनिधी

पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील जुने जाणकार तमाशा कलावंत निवृत्तीबुवा जाधव पोंदेवाडीकर यांचा नुकताच त्यांच्या गावात पोंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

निवृत्तीबुवा जाधव पोंदेवाडीकर यांनी मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर, पांडुरंग मुळे, भिका भीमा सांगवीकर व अन्य तमाशा फडामध्ये मावशीची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे व पोंदेवाडी गावचा नावलौकिक मिळविला आहे. त्यांना टोपण निवृत्तीबुवा पोंदेवाडीकर या नावाने ओळखले जाते.

या सत्कार समारंभ प्रसंगी ख.वि.संघाचे माजी अध्यक्ष
अनिल वाळुंज, माजी सरपंच जयसिंग पोंदे, उपसरपंच महेंद्र पोखरकर, गव्हर्मेंट कॉन्टॅक्टर संदीप पोखरकर, नारायण हरके नानाभाऊ पोखरकर नामदेव पोखरकर अमोल वाळुंज पोपट रोडे झुंबर वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या